शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविकेच्या घरी चोरी; साडेसात लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:26 IST

नगरसेविका रेश्मा अश्फाक कुरैशी यांचे घर फोडून चोरट्यांनी दागिने व रोख असा साडेसात लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला़

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात चोरट्यांची दिवाळी सुरूच आहे़ एका आठवड्यात शहरात तब्बल चार धाडसी घरफोड्या झाल्या आहेत़ त्या प्रकरणाचा सुगावा अद्याप लागलेला नसतानाच समतानगर वार्ड क्र. ६६ येथील नगरसेविका रेश्मा अश्फाक कुरैशी यांचे घर फोडून चोरट्यांनी दागिने व रोख असा साडेसात लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला़ ही धाडसी घरफोडी सोमवारी (दि़.३०) रात्री १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली़ मंगळवारी (दि़ ३१) क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.काँग्रेसच्या नगरसेविका रेश्मा अश्फाक कुरैशी यांच्या लहान नणंदेचे लग्न होते. समतानगरमध्ये अश्फाक शेख व त्यांचे सात भाऊ हे एका घरात राहतात. घरातील सर्व सदस्य सायंकाळी विवाहाच्या निमित्ताने घराबाहेर पडले. ही संधी साधून चोरट्यांनी अश्फाक यांच्या भावाच्या खोलीचे कुलूप तोडून कपाटातील रोख ४ लाख आणि ३ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, असा अंदाजे साडेसात लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला़ अश्फाक यांचे भाऊ मस्लोद्दीन यांच्या खोलीत ही चोरीची घटना घडली़ शिवाय मस्लोद्दीन यांच्या खोलीला लागूनच असलेली त्यांचा लहान भाऊ एजाज यांची रूमदेखील चोरट्यांंनी फोडली. त्यांच्या घरातील कपाटाचे लॉकर फोडण्याचा प्रयत्न असफल ठरला. लॉकर मजबूत असल्याने चोरट्यांच्या हाती एजाज यांच्या खोलीतून काहीच लागले नाही.रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मस्लोद्दीन घरी आले असता, त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती क्रांतीचौक पोलिसांना दिली.चोरटा कॅमे-यात कैदकुरैशी यांच्या घराजवळ एका बंगल्यात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, तसेच मुख्य रस्त्यावरील मेडिकलवरही सीसीटीव्ही कॅमे-यात आरोपी कैद झाल्याचे कुरैशी यांनी सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले असून, आरोपींचा पोलीस शोध पोलीस घेत आहेत.