शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल खराब झालाय? दगडातील बॅक्टेरिया लावणार विल्हेवाट; छत्रपती संभाजीनगरमधील प्राध्यापकाचे पंधरा वर्षांपासून संशोधन 

By राम शिनगारे | Updated: January 6, 2024 09:47 IST

बॉक्साईटच्या खाणीतील दगडांमधील बॅक्टेरियापासून संगणक, मोबाइल, चार्जर, टीव्ही, रिमोटसह इतर विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये असलेल्या मदर बोर्ड म्हणजेच प्रिटेंड सर्किट बोर्डची (पीसीबी) पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्याचे संशोधन विवेकानंद महाविद्यालयातील बायोटेक्नॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विभागात केले आहे.

छत्रपती संभाजीनगर : बॉक्साईटच्या खाणीतील दगडांमधील बॅक्टेरियापासून संगणक, मोबाइल, चार्जर, टीव्ही, रिमोटसह इतर विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये असलेल्या मदर बोर्ड म्हणजेच प्रिटेंड सर्किट बोर्डची (पीसीबी) पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्याचे संशोधन विवेकानंद महाविद्यालयातील बायोटेक्नॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विभागात केले आहे. या संशोधनाचा व्यावसायिक वापर व पेटंटसाठी केंद्र शासनाच्या ‘बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंट कौन्सिल’ म्हणजेच बायरॅक संस्थेने पुढाकार घेतल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. नितीन अधापुरे यांनी दिली. 

धातूमिश्रणाचा अडथळाइलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील मदर बोर्ड कॉपर, निकेल लेड, टिन, ॲल्युमिनियम, सोने-चांदीसह इतर धातूंच्या मिश्रणातून बनविले जातात. त्यामुळे त्याची विल्हेवाट लावणे कठीण जाते. अशा मदर बोर्डची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्यासाठी डॉ. अधापुरे हे २००८ पासून संशोधन करीत आहेत. त्यांना ज्येष्ठ मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. अरविंद देशमुख यांचे सहकार्य मिळत आहे. 

मदर बोर्डचे सध्या होते काय? अनेक ठिकाणी मदर बोर्ड जाळून टाकतात. जळालेल्या मदरबोर्डमधील सर्व धातू एकत्र होऊन गट्टू तयार होतो. हे गट्टू परदेशात मोठ्या किमतीमध्ये विकण्यात येतात. विशेषत: बेल्जियममध्ये याविषयीचे तंत्रज्ञान अधिक प्रगत असल्यामुळे त्याठिकाणी गट्टू पाठवितात. त्याठिकाणी सर्व धातू वेगवेगळे करून पुन्हा वापरात आणले जातात.

असे केले संशोधन    सुरुवातीला १० लिटर नंतर १०० लिटरच्या भांड्यामध्ये मदर बोर्डची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्यात आली. अमोनियम सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट आदीच्या माध्यमातून प्रक्रिया केली. कर्नाटकातील चित्रदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील बॉक्साईट खाणीतून दगड आणले.बॅक्टेरियाच्या प्रजाती तपासून घेतल्या.

या संशोधनाचे महाविद्यालयाच्या नावाने पेटंट फाईल करीत असून, त्याच्या व्यावसायिक वापरासाठी विविध उद्योगांसोबत बोलणी सुरू आहेत. - डॉ. नितीन अधापुरे, संशोधक

टॅग्स :ResearchसंशोधनMobileमोबाइल