शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

सरकारनेच केले १०७ सोनोग्राफी केंद्रांचे 'स्टिंग ऑपरेशन'; मुलींच्या जन्मदरात कुठे आहे वाढ?

By संतोष हिरेमठ | Updated: July 17, 2025 18:35 IST

१३ केंद्रे दोषी : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये मुलींच्या जन्मदरात वाढ

छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यात १४ महिन्यांत १०७ सोनोग्राफी केंद्रांचे स्टिंग ऑपरेशन केले. यामध्ये १३ सोनोग्राफी केंद्रांवर ‘गडबड’ हाेत असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या केंद्रात गर्भलिंग चाचणी होऊन मुलींचे भ्रूण गर्भातच खुडले जातात, असे आरोप सतत होत मुलींच्या जन्मदाराविषयी नेहमी चिंता व्यक्त होते. परंतु गेल्या ३ वर्षांत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे, ही बाब दिलासादायक आहे.

उपरोक्त ३ जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी मुलींचा जन्मदर ९०० च्या खाली गेला होता. त्यामुळे गर्भलिंग निदान आणि मुलींच्या भ्रूणांचा गर्भपात होत असल्याची शक्यता व्यक्त झाली. त्यामुळे आरोग्य विभागाने स्टिंग ऑपरेशन करून गर्भलिंग निदानाचा ‘उद्योग’ बंद करण्यासाठी पाऊल टाकले. याचा दृश्य परिणाम या तीन जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढण्यात झाला आहे.

दर ३ महिन्याला तपासणीगर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान तंत्र प्रतिबंध कायदा १९९४ सुधारित अधिनियम २००३ अंतर्गत प्रत्येक सोनोग्राफी व गर्भपात केंद्राची तीन महिन्यांतून एकदा तपासणी केली जाते. तपासणीत काही त्रुटी आढळल्यास केंद्रास कारणे दाखवा नोटीस काढली जाते. नोटीसचा खुलासा जिल्हा सल्लागार समितीसमोर ठेवून संबंधित केंद्रावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येते, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नावर दिली.

कसे केले स्टिंग?गर्भलिंगनिदानाचा संशय असलेल्या सोनोग्राफी केंद्रावर गर्भवती (डिकाॅय) महिलेच्या मदतीने स्टिंग ऑपरेशन केले जाते. अशाप्रकारे राज्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षात ९४ आणि एप्रिल व मे महिन्यात १३ असे १४ महिन्यांत १०७ सोनोग्राफी केंद्रांचे स्टिंग करण्यात आले. यात १३ केंद्रे दोषी आढळली. त्यांच्या कायदेशीर कारवाई करण्यात आली.

कुठे किती गुन्हे दाखल?२०२४-२५ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये गर्भलिंग निदानाबाबत पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला. जालना जिल्ह्यात भोकरदन पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल केला असून, सोनोग्राफी मशीन विक्रीबाबत जालना पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला. तर बीड जिल्ह्यात गर्भलिंग निदान प्रकरणी २ आरोपींना अटक झाली.

जिल्हानिहाय मुलींचा जन्मदरजिल्हा - २०२२ - २०२३ -२०२४बीड -८८८ - ८८३ -९६६जालना -८५४- ८५७ - ९१९छत्रपती संभाजीनगर - ८८६ - ८८० - ९२७

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर