शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याला लागली गळती

By admin | Updated: June 29, 2016 01:02 IST

वडोदबाजार : येथील पोलीस ठाण्याची इमारत जीर्ण झाल्याने पहिल्याच पावसात गळू लागली आहे. त्यामुळे ठाण्यातील बहुतेक महत्त्वाची कागदपत्रे भिजली आहेत.

वडोदबाजार : येथील पोलीस ठाण्याची इमारत जीर्ण झाल्याने पहिल्याच पावसात गळू लागली आहे. त्यामुळे ठाण्यातील बहुतेक महत्त्वाची कागदपत्रे भिजली आहेत. त्यामुळे हे पोलीस ठाणे आता गावापासून ५ कि.मी. अंतरावर स्थलांतरित झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी (दि.२२) आणि शुक्रवारी (दि.२४) झालेल्या जोरदार पावसाने अक्षरश: पोलीस ठाण्याला जणू पावसाच्या धारा लागल्या होत्या. त्यामुळे ठाण्यात पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून नवीन पोलीस ठाण्यात स्थलांतर झाले आहे. वडोदबाजार येथील पोलीस ठाणे निजामकालीन असून याअंर्तगत फुलंब्री व सिल्लोड तालुक्यांतील ५७ गावे येतात. बुधवारी झालेल्या पावसामुळे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्याला लागलेल्या गळतीचा अनुभव आला. दरम्यान, गत दोन वर्षांपूर्वी वडोदबाजार पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे काम औरंगाबाद- जळगाव महामार्गालगत असलेल्या खामगाव फाट्याजवळील महालकिन्होळ्याच्या गायरान जमिनीवर झाले आहे. या ठिकाणी प्रशासनाने जवळपास १० एकर जागा पोलीस ठाण्यासाठी दिली आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीत पर्यायी व्यवस्था म्हणून पोलिसांनी जागा शोधली आहे. पोलीस ठाण्यात जमा असलेल्या गुन्ह्यातील व विविध अपघातांतील वाहने स्थलांतर करण्याचे काम सुरू झाले आहे. विशेष म्हणजे वडोदबाजार येथे असलेल्या पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली. या ठिकाणी कोणीही पोलीस कर्मचारी वास्तव्य करीत नसल्याने पोलीस कॉलनी भकास झाली असून, पूर्णपणे मोडकळीस आली आहे.