शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंनी पाहिले, शिंदे आले; शेतक-यांना काही नाही मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:01 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गात ज्या शेतक-यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. मात्र, त्यातून शेतकºयांच्या नशिबी खूप पडत नसून, उलट बांधाबांधावर मोबदल्यावरून प्रशासनाने भेदभाव सुरू केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गात ज्या शेतक-यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. मात्र, त्यातून शेतकºयांच्या नशिबी खूप पडत नसून, उलट बांधाबांधावर मोबदल्यावरून प्रशासनाने भेदभाव सुरू केला आहे. फतियाबाद येथील एका जमिनीला ९२ लाख रुपये एकरी भाव मिळत आहे, तर दुसरीकडे बांधाच्या पलीकडील जमिनीला १२ लाख रुपये एकरी भाव दिला जात आहे.या भेदभावामुळे आणि तालुक्यांच्या हद्दीमुळे निर्माण झालेल्या तंट्यावरून शेतकºयांना गुरुवारी पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनीही विनापरवानगी सभागृहात प्रवेश केल्यामुळे शेतकºयांवरच राग काढला. पालकमंत्री शेतकºयांना म्हणाले की, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे येऊन गेले. आणखी काय पाहिजे. त्यामुळे हवालदिल शेतकºयांना नाना पळसकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हरांड्यात ठिय्या देत त्यांची वाट पाहण्यापलीकडे काहीही करता आले नाही. सभागृहातून बाहेर आल्यानंतर पालकमंत्री कदम यांनी त्यांना मुंबईला येण्याचे निमंत्रण देत जिल्हाधिकारी कार्यालय सोडले.बाळू हेकडे, काशीनाथ हेकडे, शिवाजी भगत, धरमसिंग सुंदर्डे, कोंडिराम पल्हाळ यांनी फतियाबाद, माळीवाडा, दौलताबाद येथील जमिनींबाबत दरांमध्ये सुरू असलेला घोळ समोर आणला. दोन्ही बाजूंनी शेतकºयांची कोंडी होत आहे. ७० टक्के भूसंपादन जर प्रशासनाने केले, तर उर्वरित जमीन कायद्याने संपादित करून शेतकºयांना ठरविलेला मोबदलाच देईल. यामध्ये शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल.गुंतवणूकदारांच्या जमिनींना भावसमृद्धी महामार्गाची घोषणा होण्यापूर्वी वर्ष, सहा महिने आधी ज्या गुंतवणूकदारांनी कवडीमोल भावाने जमिनी घेतल्या, त्यांना भूसंपादनातून मोठा मोबदला मिळू लागला आहे व जे पारंपरिक शेतकरी आहेत, त्यांचे नुकसान होत आहे. काही बड्या नेत्यांच्या जमिनी तर चारही बाजूंनी कॉर्नरवर आल्या आहेत. यामध्ये मातब्बरांचे कल्याण होत असून, प्रशासन शेतकºयांच्या बाजूने काहीही बोलण्यास तयार नसल्याचा आरोप बाळू हेकडे या शेतकºयाने केला. नेते येऊन गेले तरी शेतक-यांना न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.