शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइनकडे मंडळांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:27 IST

जनजागृतीचा अभाव व आनलाइन नोंदणी करताना येणाºया अडचणींमुळे आॅनलाइन नोंदणीस गणेश मंडळांचा अल्पप्रतिसाद मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रत्येक गणेश मंडळास यंदा आॅनलाइन नोंदणी परवाना घ्यावा लागणार आहे. मात्र, जनजागृतीचा अभाव व आनलाइन नोंदणी करताना येणाºया अडचणींमुळे आॅनलाइन नोंदणीस गणेश मंडळांचा अल्पप्रतिसाद मिळत आहे.गणेश मंडळांना धर्मादाय आयुक्त विभागाच्या (चॅरिटी डॉट महाराष्ट्रा डॉट जीओव्ही डॉट इन ) या वेबसाईटवर आॅनलाइन नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आॅनलाईन नोंदणीचा फार्म भरताना गणेश मंडळांना आधार, पॅनकार्ड, ईमेल आॅयडी व मोबाईल नंबर आदी माहिती देणे बंधनकारक आहे. आॅनलाइन उपलब्ध फार्म पूर्णपणे भरल्यानंतर मंडळांना तीन ते चार दिवसात दिलेल्या ई-मेल आयडीवर प्रमाणपत्र पाठविण्यात येते. तसा संदेशही वेबसाईटवर नोंदणी केलेल्या मोबाईलवर प्राप्त होतो. मात्र, बहुतांश गणेश मंडळांच्या सदस्यांना आॅनलाइन नोंदणीच्या प्रक्रियेबाबत माहिती नाही.शिवाय आॅनलाइन नोंदणीसाठी उपलब्ध वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने गणेश मंडळांच्या सदस्यांना तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. विशेषत: तालुका व ग्रामीण भागातील मंडळांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे गणेश मंडळांच्या सदस्यांचे आॅफलाइन नोंदणीस पसंती देत आहे. मात्र, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून आॅनलाइन नोंदणीचा आग्रह धरण्यात येत असल्याने अनेक गणेश मंडळांची धावपळ होत आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत आॅनलाइन नोंदणीचे काम सुरू होते. तसेच अनेक मंडळांच्या सदस्यांनी येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयातही गर्दी केल्याचे दिसून आले.गुरुवारी जिल्हाभरातून सुमारे दोनशे मंडळांनी आॅनलाइन नोंदणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.