शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

'ओमायक्राॅनचे नाही, तर सिस्टिमचे टेन्शन'; स्वतःहून तपासणीस गेलेल्या दुबई रिटर्न ओमायक्राॅनगस्ताची आपबीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 13:20 IST

औरंगाबादेतही दुर्लक्ष, पण स्वत:हून केली चाचणी

औरंगाबाद : ‘मी जर स्वत:हून कोरोना तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य केंद्रात गेलो नसतो, तर मी कोरोनाबाधित आणि नंतर ओमायक्राॅनबाधित (Omicron Variant ) आहे, हे समोर आलेच नसते. कारण दिल्लीतील विमानतळावर माझी तपासणी झाली नाही, ना औरंगाबादेत. मला ओमायक्राॅनचे नाही, तर सिस्टिमचे टेन्शन आहे, अशी भावना दुबईहून परतलेल्या ३३ वर्षीय ओमायक्राॅनग्रस्त रुग्णाने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

या तरुणाला ओमायक्राॅनची बाधा झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. कोरोनाचे उपचार घेऊन हा रुग्ण होम आयसोलेशनमध्ये होता. परंतु अहवाल प्राप्त होताच मनपाने त्यास उपचारासाठी पुन्हा भरती केले. ‘लोकमत’शी स्वत:हून संपर्क साधून हा रुग्ण म्हणाला, १७ डिसेंबरला दुबईहून दिल्लीत दाखल झालो. प्रवासापूर्वी ४८ तास आधीचा कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल होता. दिल्ली विमानतळावर केवळ ७ दिवसांचे क्वारंटाईन सांगण्यात आले, कोणतीही तपासणी झाली नाही. त्यानंतर शहरात दाखल झालो. येथेही विमानतळावर केवळ डोसची विचारणा करण्यात आली. घरी गेलो, पण थोडी सर्दी झालेली होती. कुटुंबीयांना काही त्रास नको, म्हणून १८ रोजी स्वत: एन-८ येथील केंद्रावर जाऊन कोरोना तपासणी केली. १९ तारखेला अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे खासगी रुग्णालयात भरती झालो. मी जर तपासणी केली नसती, तर हे समोर आलेच नसते. 'एचआरसीटी स्कोर' केवळ ३ होता. इतर तपासण्या नाॅर्मल आल्या. प्रकृती सुधारल्याने पाचव्या दिवशी सुटी झाली, असेही या रुग्णाने सांगितले.

निगेटिव्ह आल्याच्या दिवशीच ओमायक्राॅनचा अहवाल२५ डिसेंबर रोजी खासगी लॅबमध्ये पुन्हा कोरोना तपासणी केली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. परंतु याच दिवशी ओमायक्राॅनचा अहवाल आला. त्यावरून मला पुन्हा भरती केले. खासगी लॅबला शासनाने परवानगी दिलेली आहे. परंतु निगेटिव्ह असताना पुन्हा भरती का केले? मी जर इथे पाॅझिटिव्ह झालो तर त्याला कोण जबाबदार राहील? त्यामुळे रुग्णालयातून सुटी दिली पाहिजे, असे हा रुग्ण म्हणाला.

मी प्रामाणिक, पण...होम आयसोलेशनमधून मी कुठेही बाहेर गेलो नाही. दुबईतील मित्र आणि आता कुटुंबीयदेखील निगेटिव्ह आलेले आहेत. मी प्रामाणिक आहे. त्यामुळे स्वत:हून तपासणी करून घेतली. कारण दुसऱ्या लाटेत कोरोना होऊन गेलेला आहे. तपासणीच्या दोन दिवसांनंतर मनपाचा फोन आला. परदेशातून आलेले किती लोक तपासणीविना शहरात फिरत आहेत, असा प्रश्न या तरुणाने उपस्थित केला. दिल्ली किंवा औरंगाबादेत विमानतळावरच तपासणी झाली असती तर मी थेट रुग्णालयात गेलो असतो, असेही तो म्हणाला.

...म्हणे कडेकोट बंदोबस्त..रुग्ण कडेकोट बंदोबस्तात असल्याचे म्हटले जात आहे. रुग्ण आहे, एखादा गुन्हेगार नाही. त्यामुळे नागरिकांनी फार भीती बाळगू नये. लस घेतली पाहिजे, असेही हा तरुण म्हणाला.

परदेशातून आलेल्या प्रत्येकाची तपासणीपरदेशातून आलेल्या नागरिकांची यादी करण्यात आली आहे. प्रत्येकाला शोधून तपासण्यात येत आहेत. सदर ओमायक्राॅनगस्त तरुणाचा सोमवारी पुन्हा एकदा स्वॅब घेतला जाईल. त्याच्या कुटुंबातील तिघांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांची ७ दिवसांनंतर पुन्हा एकदा तपासणी केली जाईल.- डाॅ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या