शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेतील तणाव निवळला; परिस्थिती नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 01:05 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले पोस्टर समाजकंटकांनी फाडल्यावरुन शहराच्या अनेक भागात गुरुवारी निर्माण झालेला तणाव रात्रीतून निवळला. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे रात्री पोलीस अधिका-यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले पोस्टर समाजकंटकांनी फाडल्यावरुन शहराच्या अनेक भागात गुरुवारी निर्माण झालेला तणाव रात्रीतून निवळला. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे रात्री पोलीस अधिका-यांनी स्पष्ट केले.शिवजयंतीनिमित्त लावलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर गुरुवारी सायंकाळी तीन समाजकंटकांनी फाडल्याने शहरात तणाव निर्माण झाला होता. शिवप्रेमी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर पुंडलिकनगर, गजानन महाराज मंदिर, गारखेडा परिसर, मुकुंदवाडी, सिडको, हडको, टीव्ही सेंटर परिसरातील व्यापाºयांनी आपापली दुकाने बंद केली. पोलिसांनी तत्परता दाखवून तीन संशयिताना गुरुवारी रात्रीच ताब्यात घेतले.गारखेडा परिसरातील विजयनगरलगतच्या शिवनेरी कॉलनीत शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. तीन समाजकंटकांनी हे पोस्टर्स फाडले. यानंतर ते तिघे लोकांना चाकू दाखवून तेथून निघून गेले. ही घटना कळताच नागरिकांनी पुंडलिकनगर ठाण्यात धाव घेतली. त्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पोलिसांकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याचे पाहून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. शिवाजी महाराजांचे पोस्टर्स फाडण्यात आल्याचे कळताच पुंडलिकनगर, विजयनगर, गारखेडा परिसर, गजानन महाराज मंदिर चौक, हनुमाननगर, जयभवानीनगर, मुकुंदवाडी, सिडको कॅनॉट मार्केट, टीव्ही सेंटर येथील व्यापाºयांनी दुकाने बंद केली होती. या घटनेनंतर पोलीसांनीही तातडीने पावले उचलत पोस्टर फाडणाºया तरुणांना शोधून ताब्यात घेतले. त्यामुळे रात्रीतून हा तणाव निवळण्यास मदत झाली.आरोपींना अटक, शांतता राखावी -उपायुक्त श्रीरामेपोलिसांनी त्या तिन्ही समाजकंटकांना अटक केली आहे. नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले. टीव्ही सेंटर येथे जमाव जमल्याचे कळताच तेथे शीघ्र कृतिदलाचे जवान आणि सिडको विभागाचे सहायक आयुक्त नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी धाव घेतली. तर पुंडलिकनगर ठाण्यात आपण स्वत: पोलीस निरीक्षक एल. ए. शिनगारे यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी शहरातील बंदोबस्त वाढविला असून, विविध ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.टी.व्ही. सेंटर येथे जमावटी.व्ही. सेंटर येथे सुमारे दोन ते अडीच हजार लोकांचा जमाव रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर उभा होता. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी मोठा फौजफाटा तेथे तैनात केला. रात्री उशिरापर्यंत सिडको, हडको आणि टी.व्ही. सेंटर परिसरात तणावपूर्ण शांतता होती.