शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आठ्ठरवाडीत स्मशानभूमीवरून तणाव

By admin | Updated: August 9, 2014 00:28 IST

पुसेगाव : हिंगोली तालुक्यातील आठ्ठरवाडी येथे स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने तणाव निर्माण

पुसेगाव : हिंगोली तालुक्यातील आठ्ठरवाडी येथे स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने आणि आतापर्यंत ज्याठिकाणी अंत्यसंस्कार केले जायचे, त्याठिकाणी घरे बांधण्यात आल्याने ८ आॅगस्ट रोजी सकाळी एका ग्रामस्थाच्या निधनानंतर मोठा बाका प्रसंग निर्माण झाला. जागेच्या कारणावरून गावात काही काळ तणाव निर्माण झाल्याने तहसीलदार पोलिसांच्या फौजफाट्यासह गावात दाखल झाल्यानंतर हा प्रश्न सांमजस्याने सोडविण्यात आला. आठ्ठरवाडी येथील शेतकरी निवृत्ती गोविंदा सिरामे, शेषराव गोविंदराव सिरामे व त्यांची मुले अनेक वर्र्षापासून गाव सोडून बाहेरगावी कामासाठी गेले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी सिरामे यांच्या मालकीच्या गट क्र.५०३ व ४८७ मधील शेताचा अंत्यविधीसाठी वापर सुरू केला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी निवृत्ती व शेषराव सिरामे हे कुटुंबियांसह गावात राहण्यासाठी आले आहेत. त्याठिकाणी त्यांनी घर बांधून राहण्यास सुरूवात केली असून ‘आता या ठिकाणी अंत्यविधी करू नका’अशी ग्रामस्थांना विनंतीही केली. ८ आॅगस्ट रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आठ्ठरवाडी येथील गणपतराव सटवाजी सिरामे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी कुठे करायचा? हा प्रश्न निर्माण झाला. काही ग्रामस्थांनी गावालगतच्या गट क्र.५०३ व ४८७ मध्येच अंत्यविधी करण्याचा आग्रह धरला. त्यास निवृत्ती सिरामे व शेषराव सिरामे यांनी विरोध दर्शवल्याने गावात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे मंडळ अधिकारी एम. एस. खंदारे, तलाठी इनामदार व ग्रामसेवकाने याबाबत प्रशासनाला कळविले. त्यानुसार हिंगोलीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर, गटविकास अधिकारी डॉ. विशाल राठोड, नर्सी ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम बाचेवाड पोलिसांचा फौजफाटा घेऊन सकाळी ८ वाजता गावात दाखल झाले.तहसीलदार कडवकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. आठ्ठरवाडीतील स्मशानभूमीची ग्रामपंचायतीकडे नमुना नं. ८ व सातबाराला नोंद नसल्याने शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी हिंगोलीच्या न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे. परंतु त्याबाबत अद्याप कोणताही आदेश देण्यात आलेला नसल्याने पूर्वीप्रमाणे परंपरागत स्मशानभूमी असलेल्या जागेवर अंत्यविधी केला जावा, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. त्यावर तहसीलदार कडवकर यांनी पोलीस पाटील शालिकराम सिरामे, ग्रा. पं. सदस्य कानबाराव सिरामे, पंजाबराव कुरूंदे पाटील व ग्रामस्थांना समजावून सांगत हा वाइ मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जमिनीचे मूळ मालक असलेल्या सिरामे यांनी रस्त्याच्या पलीकडे आपल्या गट क्र.४३० मधील २ गुंठे जमीन स्मशानभुमीसाठी तत्काळ उपलब्ध करून दिली. त्यामुळे अखेर हा प्रश्न सुटला आणि शुक्रवारी दुपारी ३ वाजता त्याठिकाणी गणपतराव सिरामे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभुमीच्या वादामुळे आठ्ठरवाडीत शुक्रवारी दिवसभर तणावाची स्थिती होती. बीडीओ राठोड यांनी स्मशानभुमीच्या नवीन जागेवर पंचायत समितीमार्फत शेड उपलब्ध करून दिले जाईल, असे ग्रामस्थांना सांगितले. तहसीलदारांच्या पुढाकाराने गावातील हा प्रश्न सोडविण्यात प्रशासनाला यश आले. (वार्ताहर)