औरंगाबाद : परभणी- मनमाड दुहेरी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी निविदा काढण्यात आली असून, दुहेरी रेल्वेमार्गासाठी किती जमीन लागेल याची पाहणी सर्वेक्षणातून केली जाणार आहे. ही माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे एडीआरएम पी.बी. निनावे यांनी दिली.पी.बी. निनावे यांनी सोमवारी रेल्वेस्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मुदखेड- परभणी दुहेरी रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले आहे.सध्या या कामाची निविदा काढण्यात आली आहे, तर परभणी- मनमाड हा रेल्वेमार्ग दुहेरी करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. या दुहेरी मार्गासाठी किती जागा लागेल, याबाबतचे सर्वेक्षण करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. २०१४ च्या रेल्वे अर्थसंकल्पातून त्यासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर सर्व्हेचा मार्ग मोकळा होईल, अशी माहिती त्यांनी दिली.रेल्वेस्थानक चकाचकपी.बी. निनावे रेल्वेस्थानकाची पाहणी करणार असल्याची माहिती मिळाल्याने स्थानक आणि परिसर चकाचक करण्यावर भर देण्यात आला. पी.बी. निनावे यांनी स्थानकावरील फूडप्लाझा, कॅन्टीन, लिफ्टसह स्थानकावरील विविध सोयी-सुविधांचे निरीक्षण केले.यावेळी स्थानक व्यवस्थापक अशोक निकम, असिस्टंट डिव्हिजनल इंजिनिअर चंद्रमोहन यांच्यासह स्थानिक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.रेल्वेस्थानकावर अधिकारी येणार, अशी पूर्वसूचना मिळाल्याने स्थानकावरील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्यात आले.प्लॅटफॉर्मची स्वच्छता करताना थेट रेल्वेस्थानकात प्रवेश करणाऱ्या मार्गापर्यंत स्वच्छता करण्यात आली.रिक्षा गायबअधिकारी येणार याची पूर्वसूचना असल्याने दररोज रेल्वेस्थानकाच्या आवारात आणि प्रवेशद्वारावर बेशिस्तपणे उभ्या राहणाऱ्या रिक्षाही गायब झालेल्या दिसून आल्या.
दुहेरी रेल्वेमार्गांच्या सर्वेक्षणासाठी निविदा
By admin | Updated: June 10, 2014 00:59 IST