शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भाडेकरूने घरमालकाच्या नावावर काढले साडेचार लाखांचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:03 IST

औरंगाबाद : घरात भाडेकरू असलेल्या एका व्यक्तीने वृद्ध घरमालकाला बँकेच्या ऑनलाइन व्यवहारासाठी वारंवार मदत करीत पासवर्ड, ओटीपी मिळवले. यानंतर ...

औरंगाबाद : घरात भाडेकरू असलेल्या एका व्यक्तीने वृद्ध घरमालकाला बँकेच्या ऑनलाइन व्यवहारासाठी वारंवार मदत करीत पासवर्ड, ओटीपी मिळवले. यानंतर एचडीएफसी बँकेतून ऑनलाइन ४ लाख २५ हजार रुपये एवढे कर्ज काढले. यातील ३ लाख ८५ हजार रुपये स्वत:सह डिमॅट खात्यावर हस्तांतरित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मनोज चंद्रकांत फडके (रा. अच्युतानंद अपार्टमेंट, एस. बी. रोड, दहीसर, मुंबई) असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. रमेश नानुलाल मिश्रा (६०, रा. लक्ष्मी रेसिडेन्सी, आलोकनगर, सातारा परिसर) यांच्या घरात मनोज फडके हा किरायाने राहत होता. त्याने १ जून २०१९ ते २० जुलै २०२० या काळात रमेश यांना ऑनलाइनबाबत कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे रमेश हे ऑनलाइनद्वारे वस्तू मागविण्यासाठी फडकेची मदत घेत होते. मनोज मोबाइलवरून माहिती भरून द्यायचा. त्यासाठी पासवर्ड आणि ओटीपीचा उपयोग करायचा. मनोज फडके शेअर्सचा व्यवसाय करत असल्यामुळे त्याला बाजारपेठेत गुंतवणूक करण्याचे आणि शेअर्स विक्री करण्याचा अनुभव होता. त्याने रमेश यांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळू शकतो, असे आमिष दाखवले. तो नेहमी शेअर मार्केटिंगवर माहिती देत होता. शेअर मार्केटिंग शिकवीत रमेश यांना बँकेत डी मॅट खाते उघडण्यास सांगितले. त्याप्रमाणे रमेश यांनी बँकेत खाते उघडले. त्यांच्या खात्यावर सन २०१९ मधील जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत खात्यावर प्रायोगिक तत्त्वावर व्यवहार करण्यात आला. मात्र, शेअर मार्केटमधून रमेश यांना कोणताही फायदा झाला नाही. त्यामुळे त्यांनी या खात्यावरील व्यवहार बंद केला. याचदरम्यान फडकेने त्यांच्या नावे बँकेतून ४ लाख २५ हजारांचे ऑनलाइन कर्ज घेतले. त्यापैकी ३ लाख ८५ हजार रुपये हस्तांतरित केले. पुढील तपास उपनिरीक्षक सर्जेराव सानप करत आहेत.

न्यायालयाच्या आदेशान गुन्हा दाखल

रमेश मिश्रा यांनी फसवणूक झाल्याची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशाने गुरुवारी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.