शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लासूर स्टेशन गावात तब्बल दहा तास वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:04 IST

लासूर स्टेशन : परिसरात मागील काही दिवसांपासून विजेचा लंपडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरण विभागाने याकडे दुर्लक्ष ...

लासूर स्टेशन : परिसरात मागील काही दिवसांपासून विजेचा लंपडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरण विभागाने याकडे दुर्लक्ष केले असून त्यांच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांच्या माथी बसत आहे. बुधवारी रात्री ते सकाळपर्यंत तब्बल दहा तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना दहा तास अंधारात राहावे लागले.

लासूर स्टेशन हे जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठेचे गाव असूनदेखील येथील महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. विजेचा लंपडाव कायमच सुरू असल्याने नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात; परंतु त्याला महावितरणकडून प्रतिसाद दिला जात नाही. त्यातच पावसाला सुरुवात झाली की नाही, तोच वीज खंडित होते किंंवा तांत्रिक अडचणीमुळ‌े बंद केली जाते. याला महावितरणच कारणीभूत आहे. मान्सूनपूर्व विजेची कामे न केल्याने असा प्रकार घडू लागला आहे. बुधवारी रात्री, तर कहरच झाला. पावणेबारा वाजेच्या सुमारास विजेचा पुरवठा खंडित झाला. तो गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरळीत झालाच नाही. तब्बल दहा तास येथील नागरिकांना अंधारात राहावे लागले. तर नागरिकांना रात्रभर उकाड्याचा सामना करावा लागला.

----

महावितरणच्या कामाचे पितळ उघडे

लासूर स्टेशनचे ३३ केव्ही सबस्टेशन गंगापूर वीज वितरण कार्यालयाकडून बंद करण्यात आली. त्यामुळे लासूर स्टेशनसह वाडी-वस्तीतील नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागली. लासूरच्या सबस्टेशनसाठी अन्यत्र पर्यायी जोडणीची व्यवस्था असती, तर तब्बल दहा तास नागरिकांना त्रास सहन करावा लागला नसता; परंतु महावितरणचे नियोजन शून्य कामाचे पितळ यानिमित्त उघडे पडले आहे.