शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

बस खरेदीला मनपाचा तूर्त ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:58 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत १३ नवीन बस खरेदी करण्याचा प्रस्ताव गुरुवारी मनपा प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर ठेवला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत १३ नवीन बस खरेदी करण्याचा प्रस्ताव गुरुवारी मनपा प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर ठेवला. शहर बससेवा चालविण्यासाठी महापालिकेकडे कोणतीच यंत्रणा नाही. अशा परिस्थितीत ३ कोटी रुपये खर्च करून कशासाठी बस खरेदी करण्यात येत आहेत, या मुद्यावर नगरसेवकांनी प्रशासकीय हेतूला ‘ब्रेक’लावला. नगरसेवकांचा विरोध लक्षात घेऊन महापौर बापू घडमोडे यांनी प्रस्ताव तूर्त स्थगित ठेवला.शहर बससेवा चालविण्याचे दायित्व महापालिकेवर असतानाही मागील काही वर्षांपासून प्रशासन ही जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. एसटी महामंडळाने अनेकदा ही सेवा बंद करण्याचा इशारा दिला. तरीही महापालिका कोणतेच ठोस पाऊल उचलण्यास तयार नाही. अनेकदा खाजगी कंत्राटदारांमार्फत ही सेवा सुरू करण्याचे प्रयत्न झाले, पण राजकीय मंडळींना यश प्राप्त झाले नाही. गुरुवारी सर्वसाधारण सभेत ऐनवेळी मनपा प्रशासनाने एक धक्कादायक प्रस्ताव ठेवला. त्यात शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेत १३ मिनी बस खरेदी करण्याचा मानस व्यक्त केला. त्यासाठी विविध कंपन्यांच्या डीलर्सकडून दरपत्रकेही मागविण्यात आल्याचे नमूद केले. छोट्या बसमध्ये आसन क्षमता ३४ राहील. पर्यटकांसाठी एक ४० आसनी वातानुकूलित, दुसरी १९ आसनी वातानुकूलित बस खरेदी करण्यात येईल. सर्व बस खरेदी, आरटीओची फिस आदी कामांसाठी सुमारे ३ कोटी रुपये लागतील, असेही प्रस्तावात शहर अभियंता सिकंदर अली यांनी नमूद केले. शासनाकडून साडेतीन कोटी रुपयांचे अनुदान मिळविण्यासाठी हा प्रस्ताव मंजूर करावा, असा आग्रह त्यांनी धरला.