बीड शहरातील प्रसिद्ध असणाऱ्या कंकालेश्वर मंदिराला चमूने भेट दिली. यावेळी मंदिर परिसरात काही मुले थांबलेली होती. तेथे जाऊन थांबले असता मंदिराचे पुजारी गुरव तात्काळ दाखल झाले. कोण तुम्ही अन् कशासाठी फोटो काढतायत ? असा प्रश्न त्यांनी विचारताच त्यांना चमूने माहिती दिली. त्यानंतर गुरव यांनी मंदिर सुरक्षिततेबद्दलच्या समस्या व माहिती सांगितली. मंदिरासाठी एका गार्डची नियुक्ती करण्यात आली होती मात्र तो अनेक दिवसापासून गैरहजर असल्याने मीच मंदिराकडे लक्ष देतो असे सांगितले. रात्री दोन वाजता पोलिसांची गाडी राऊंडसाठी येते असेही ते म्हणाले. बीड: श्रावण महिना सुरु झाल्याने मंदिरे गजबजलेली पहावयास मिळते. याच महिन्यापासून खऱ्या अर्थाने मोठ्या उत्सवाला सुरुवात होते. दिवसा गजबजलेली असलेली मंदिरे रात्री असुरक्षित असल्याचे सांगितल्यावर आश्चर्य वाटायला नको. गणपती उत्सव जवळ आल्याने ‘लोकमत’ने मंदिर सुरक्षा रक्षकांचे स्टिंग आॅपरेशन बुधवारी रात्री केले. यासाठी बीड शहरातील सात मंदिरांची निवड करण्यात आली होती. यापैकी केवळ एका मंदिराच्या रखवालदाराने विचारपूस केली तर तीन मंदिरामध्ये सुरक्षा रक्षकच नव्हते़ इतर तीन मंदिरातील सुरक्षा रक्षक सांयकाळी नऊ वाजताच झोपी गेल्याचे निदर्शनास आले. एकंदरीत, मंदिराला पुरेशी सुरक्षा नसल्याने कोणाताही अनर्थ घडू शकतो हा दाखविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. बीड शहरातील बार्शीनाका परिसराच्या नजीक व बिंंदुसरा नदीच्या बाजूला असलेल्या सोमेश्वर मंदिरात प्रवेश केला. त्यावेळी दोन सुरक्षा रक्षक झोपलेले असल्याचे दिसून आले. वाहनांचा आवाज ऐकून एक रक्षक जागा झाला. त्याने चमूला कोणतीही विचारणा केली नाही. चमुने परिसराची पाहणी केली काही वेळ तेथे थांबले मात्र विचारपूस करणारे कोणीही नव्हते. श्रावण महिना असल्याने अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मंदिराची सुरक्षा कुचकामी असल्याचे समोर आले. लोकमतने केलेल्या स्टिंग दरम्यान पोलिसांचे गस्त पथक फिरताना दिसून आले़ ४मात्र गस्तपथकातील पोलीस मंदिरामध्ये सुरक्षेची पाहणी करण्यासाठी आल्याचे दिसून आले नाही़ ४रस्त्यावरुन पोलिसांच्या गाड्या सुसाट धावताना पहावयास मिळाल्या़ ४मंदिर सुरक्षेसाठी पोलिसांनी आॅडीटचा उपाय शोधला होता परंतु गस्तीवरील पोलीस मंदिरात जाऊन भेटीची नोंद करीत नाहीत़बीड शहरातील शाहूनगर भागातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात कोणताही सुरक्षा रक्षक असल्याचे दिसत नव्हते़ मंदिरातील दिवे सुरु होते व गेटला कुलूप लावल्याचे दिसून आले. सदरील मंदिर प्रसिद्ध असल्या कारणाने सुरक्षा असणे अपेक्षित होते. परंतु तसे काहीही दिसून आले नाही़शहरातील मुख्य बाजारपेठेनजीक असलेल्या सहयोग नगर भागातील सर्वेश्वर गणेश मंदीर भाविकांनी नेहमीच गजबलेले असते. सांयकाळी महिला मंदिरात भजन गातात तर रात्री उशिरा पर्यंत भाविक दर्शनासाठी येतात. या प्रसिद्ध मंदिरात सुरक्षा रक्षक नसल्याची धक्कादायकबाब समोर आली. दरम्यान, सहा महिन्यापूर्वीच या मंदिरातील दानपेटी चोरांनी उचलून नेली होती़ या प्रकरणी शहर ठाण्यात गुन्हाही नोंद झाला होता़ चोरीची घटना घडूनही मंदिरातील सुरक्षेसाठी सीसीटीव्ही वगळता कोणातीही ठोस उपाययोजना नसल्याचे दिसून आले़