शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

वर्षभरातून महिलांसाठी एकदाच उघडतात मंदिराचे दरवाजे!

By admin | Updated: November 25, 2015 00:22 IST

प्रताप नलावडे, बीड कार्तिक स्वामीचे राज्यातील आद्य मंदिर म्हणून उल्लेख होत असलेल्या पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील प्राचीन मंदिराचे दरवाजे वर्षभरातून केवळ

प्रताप नलावडे, बीड कार्तिक स्वामीचे राज्यातील आद्य मंदिर म्हणून उल्लेख होत असलेल्या पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील प्राचीन मंदिराचे दरवाजे वर्षभरातून केवळ एकच दिवस महिलांसाठी उघडतात. बुधवारी कार्तिकी पोर्णिमेच्या निमित्ताने दिवसभर महिलांना मंदिर खुले असून मराठवाड्यातून महिला भाविक दर्शनासाठी दरवर्षी येत असल्याची माहिती अश्वलिंग संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. मधुकर महाराज यांनी दिली. वर्षभर या मंदिरात विविध धार्मिक सोहळे सुरू असले तरी महिलांना मात्र वर्षभरातून एकदाच दर्शन घेता येते. प्राचीन परंपरेनुसार कार्तिक स्वामीच्या जन्म सोहळ्याच्या म्हणजे कार्तिक पोर्णिमेच्या दिवशी पहाटे चार वाजल्यापासून महिलांना मंदिरात प्रवेश देण्यात येतो. रात्री उशीरापर्यंत दर्शन घेता येते. वर्षभरातून एकदाच होणाऱ्या या सोहळ्यासाठी मराठवाड्यातून भाविक महिला येथे येतात. बीड पासून पन्नास किलोमिटर अंतरावर आणि कल्याण ते विशाखापट्टणम महामार्गावर हे मंदिर आहे. पिंपळवंडी येथील कार्तिक स्वामीचे हे मंदिर आठशे वर्षापूर्वीचे असून अश्वलिंग संस्थानचे गंगाभारती महाराज यांनी मंदिर बांधल्याचे सांगण्यात येते. कार्तिक स्वामीची मुर्ती सहा मुखांची असून प्राचीन मुर्तीची झीज झाली असल्याने यावर्षी अशीच सहा मुखाची आणि मयुरावर बसलेल्या मुर्तीची संस्थानच्या वतीने प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. जुनी मुर्ती पाषाणाची असून तिची उंची दोन फूट आहे. सहा मुखाची ही मुर्ती मयुरावर बसलेली आहे. नव्याने तयार केलेल्या मूर्तीची उंची चार फुटाची असून या दोन्ही मुर्ती एकाच ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. आख्यायिकेप्रमाणे कार्तिक स्वामी हे सन्यस्थ वृत्तीचे होते आणि त्यामुळे महिलांना त्यांचे दर्शन घेता येत नसे. आई पार्वतीने त्यांना तुझ्या जन्मदिवसाच्या दिवशी तरी किमान महिलांना दर्शन दे, असे सांगितल्यानंतर त्यांनी ते मान्य केले. त्यामुळे वर्षभरातून एकदा महिलांना त्यांच्या मंदिरातही प्रवेश दिला जातो. संस्थानच्या वतीने नाथ सष्टीला कार्तिक स्वामींची पालखी पैठणला नेली जाते. चैत्र महिन्यात शिव-सती विवाहाच्या तिथीच्या मुहुर्तावर मंदिरातही मोठा उत्सव साजरा केला जातो.