पालम : धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने ९ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयावर निर्धार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्व राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांसह धनगर बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील घोरपडे गल्लीमधील अहिल्यादेवी होळकर समाज मंदिरापासून या मोर्चाची सुरुवात झाली. बसस्थानक परिसर, शनिवार बाजार, मुख्य चौक या मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चात जिल्हास्तरावरील बबन मुळे, विठ्ठल रबदडे, बालाजी देसाई, सुरेश भुमरे, प्रा. शिवाजी दळणर, मारोती बनसोडे, मारोती पिसाळ, अॅड. भोजाजी बनसोडे, नारायण खरवटे यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील धनगर समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसील कार्यालयासमोर मोर्चेकऱ्यांना मान्यवरांंनी मार्गदर्शन केले. तसेच आगामी काळात धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आंदोलनात सुभाष धुळगुंडे, संदीप अळनुरे, गोपाळ देवकते, शिवराम पैके, ज्ञानोबा घोरपडे, नरहरी घोरपडे, विजय घोरपडे, गणेश घोरपडे, तुकाराम लांडे, शामराव काळे, माधव वाघमारे, साहेब शेंगुळे, भागवत हाके यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आरक्षणासाठी तहसीलवर मोर्चा
By admin | Updated: August 10, 2014 00:10 IST