शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

लघूशंकेसाठी जाणाऱ्या तरूणाचा रॉडने मारहाण करून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 21:08 IST

शेजाऱ्यांनी पत्र्याच्या शेडला धक्का लागल्याच्या कारणाने केला हल्ला

औरंगाबाद:   शेजारील कुटुंबाच्या हल्लयात गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान सोमवारी दुपारी घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. ही मारहाण बीडबायपासवरील बेंबडे हॉस्पिटलमागील वसाहतीत ९ नोव्हेंबर रोजी रात्री दिड ते दोन वाजेच्या सुमारास  झाली होती. याविषयी आरोपी दोन महिलांसह तरूणाविरोधात सातारा ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

अनिल शिवदत्ता फुलमाळे(२६), अनिलची पत्नी सोनी  फुलमाळे आणि आई मालन फुलमाळे (५५)अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. संतोष स्वामी गुढे( २७, रा.बीडबायपास)असे मृताचे नाव आहे. याविषयी सातारा पोलिसांनी सांगितले की, बायपासवरील एका रुग्णालयाच्या मागे संतोष गुढे हा तीन बहिणीसह पत्र्याचे शेडमध्ये राहात होता. त्यांच्या शेजारीच आरोपी अनिल, त्याची पत्नी आणि आईसह राहात होते. ९नोव्हेंबर रोजी रात्री संतोषने त्याच्या नातेवाईकासह जेवण केले आणि तो झोपला. रात्री दोन  वाजेच्या सुमारास तो झोपेतून उठला आणि लघूशंकेसाठी जाऊ लागला.

तेव्हा घरोशेजारील फुलमाळे यांच्या पत्र्याच्या शेडच्या बल्लीला संतोषचा पाय लागला. यामुळे फुलमाळे दाम्पत्य झोपेतून उठले आणि त्यांनी संतोषला पकडले. तू मुद्दाम आमच्या घराच्या पत्र्याचे शेड पाडण्यासाठी लाकडी बल्लीला लाथ मारल्याचा आरोप करीत अनिल, त्याची पत्नी सोनी आणि आई यांनी त्याच्यावर रॉडने हल्ला चढविला. या मारहाणीत अनिल गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. भांडणाच्या आवाजाने संतोषची आत्या गुरूबाई शेवाळे आणि बहिणी या मदतीला धावल्या आणि त्यांनी भांडण सोडविले. यानंतर त्यांनी गंभीर जखमी अवस्थेत संतोषला घाटी रुग्णालयात दाखल केले. तेव्हापासून संतोष बेशुद्धावस्थेत उपचार घेत होता. दरम्यान संतोषचा उपचारादरम्यान सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. या घटनेनंतर मृताची आत्या गुरूबाई यांनी सातारा ठाण्यात आरोपी अनिल, सोनी आणि मालन फुलमाळे यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला.

संशयितांना घेतले घनसावंगीतून ताब्यातसंतोषवर हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळताच सातारा ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे, उपनिरीक्षक विक्रम वडणे आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी आरोपींचा शोध सुरू केला तेव्हा ते  घराला  पळून गेल्याचे समजले. यानंतर दरम्यान आज संतोषचा मृत्यू झाल्याचे कळताच पोलिसांनी संशयित आरोपींना घनसावंगी(जि. जालना)येथून ताब्यात घेतल्याची माहिती निरीक्षक पोटे यांनी दिली.