शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

‘फक्त तुझ्याचसाठी’च्या टीमसोबत सखीमंच सदस्यांची धम्माल

By admin | Updated: July 21, 2016 01:04 IST

जालना : ‘फक्त तुझ्याचसाठी’ या मराठी चित्रपटाच्या संपूर्ण टिमसोबत सखीमंच सदस्यांना संवाद साधण्याची संधी बुधवारी लोकमतने उपलब्ध करुन दिली.

जालना : ‘फक्त तुझ्याचसाठी’ या मराठी चित्रपटाच्या संपूर्ण टिमसोबत सखीमंच सदस्यांना संवाद साधण्याची संधी बुधवारी लोकमतने उपलब्ध करुन दिली. यावेळी मंचच्या सदस्यांनी चित्रपटातील कलावंतांसोबत नृत्य करुन मनमुराद आंनद लुटला. राज्यात १९ आॅगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वीच जालना शहरातील खेरुडकर मंगल कार्यालयात या चित्रपटातील नायक यश कपूर दिग्दर्शक प्यारेलाल शर्मा, निर्माता करण पटेल, क्रियेटीव्ह डायरेक्टर स्वपन रे आणि या चित्रपटात अ‍ॅटम साँग करणारी मिस महाराष्ट्र अंकिता या टीमने चित्रपटाचा आशय आणि कथेचा परिचय सखी मंचच्या सदस्यांना करुन दिला. याप्रसंगी यावेळी लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी राजेश भिसे, जिल्हा व्यवस्थापक मकरंद शहापूरकर उपस्थित होते. यश कपूर म्हणाला, सामाजिक आशयाला धरून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. संसारामध्ये पती- पत्नीने एकमेकांना समजावून घेतले, तर संसार चांगला फुलण्यास मदत होते. त्यामुळे पहिली दुसरी कोणीच नाही. फक्त तुझ्याचसाठी असे चित्रपटाचे नाव देण्यात आल्याचे दिग्दर्शक प्यारेलाल यांनी आवर्जून सांगितले. प्रेयसी की जीवनसाथी म्हणून आई वडिलांनी पसंत केलेली मुलगी या दोघींतून नायकाला एकीला पसंत करावे लागते. तेव्हा आई-वडिलांनी पसंत केलेल्या मुलीशीच नायक विवाह करतो. परंतु त्यानंतर खऱ्या आयुष्याला सुरूवात होते. विविध वळणांवर हा चित्रटपट नेत असल्याचे नायक यश कपूर यांनी सखींशी संवाद साधताना सांगितले. कितीही मॉडर्न झालो तरी आई-वडिलांनी पसंत केलेल्या मुलीशीच आपण विवाह केला पाहिजे, असे त्याने सांगितले. आई-वडिल हेच आपले दैवत असले पाहिजे, असा आग्रह त्याने यावेळी धरला. कारण आई-वडिलांची पसंत हिच परिपूर्ण असते. हेच या चित्रपटाचा गाभा आहे. नव्या पिढीला सुध्दा चित्रपट आवडेल, असे त्याने आवर्जून सांगितले. विशेष म्हणजे या चित्रटात मराठी संस्कृती आपल्या दिसून येणार असून, प्रथमच विविध प्रकारचे स्टंट यामध्ये वापरण्यात आले असल्याचे यशने सांगितले. स्त्रीचे कुटुंबात काय स्थान असावे, हे या चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले. (प्रतिनिधी)