लातूर : निलंगा तालुक्यातील येळणूर येथील बनावट खतप्रकरणातील मुख्य आरोपी दिनेश कुलकर्णी व विजय स्वामी याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे़ दरम्यान, बनावट खत प्रकरणातील रिकाम्या पोत्यांच्या तपासासाठी पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्या नेतृत्वाखाली पथक तेलंगणातील बिचकुंदाकडे रवाना झाले आहे़ निलंगा तालुक्यातील येळनूर येथील दिनेश कुलकर्णीचा खत विक्रीचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्याने निलंगा एमआयडीसी परिसरात गोडावून टाकले. या गोडावूनमध्ये डीएपी खताचे रिकामे पोते आणून त्यात डीएपीच्या धर्तीवरचा खत तयार करायचा. हा खत तयार करण्यासाठी साधारणपणे एका पोत्यासाठी ३०० रुपये तो खर्च करायचा. पॅकिंगसाठी आणि रिकाम्या पोत्यांसाठी वेगळा खर्च. ४०० ते ५०० रुपये खर्च करून तयार झालेला हा बनावट डीएपी खत तो १००० रुपयांना एक पोत्याप्रमाणे विकायचा. याप्रकरणी पोलिस कोठडीनंतर आरोपी दिनेश कुलकर्णी व त्याचा साथीदार मुखेड तालुक्यातील सावरमाळ येथील विजय गंगाधर स्वामी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे़ दरम्यान, पोलिसांनी या रिकाम्या पोत्यांच्या तपासणीसाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तेलंगणाकडे रवाना केले आहे़ (प्रतिनिधी)बनावट खत प्रकरणातील रिकामे पोते पुरविणारा विजय स्वामी या आरोपीस पोलिस कोठडी मिळाल्यानंतर सदरील पोते तेलंगणातील बिचकुंदा येथून आणल्याची कबुली त्याने दिली़ दरम्यान, या तपासासाठी सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वाखाली पथक तेलंगणाकडे रवाना झाले असून, रविवारी सायंकाळपर्यंत ७ दुकानांची तपासणी करण्यात आली़ परंतू, त्या पोत्यांचा सुगावा मात्र लागला नसल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांनी सांगितले़
तपासासाठी पथक तेलंगणाला रवाना
By admin | Updated: July 18, 2016 01:08 IST