शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीच्या चौकशीसाठी पथक

By admin | Updated: August 19, 2016 01:01 IST

चाकूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चाकूर तालुक्यातील हाडोळी येथे दहा लाभार्थ्यांना सिंचन विहीर मंजूर करण्यात आली होती़

चाकूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चाकूर तालुक्यातील हाडोळी येथे दहा लाभार्थ्यांना सिंचन विहीर मंजूर करण्यात आली होती़ त्यापैकी सरपंच शंकरराव चाटे यांनी विहीर न खोदता अनुदान व मजूरी लाटल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते़ या वृत्ताची दखल घेत तहसीलदारांनी विहीरीच्या चौकशीसाठी दोन पथके नेमली आहेत़ या पथकाला सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत़पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता नाबदे व चाकूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस़जी़ पुट्टेवाड यांचे एक पथक असून, पंचायत समितीचे सहाय्यक लेखा अधिकारी राजूरे, चाकूर तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी एम़डी़ बेजगमवार यांचे एक पथक नियुक्त केले आहे़ पथकाने चाकूर तालुक्यातील मौजे हाडोळी येथे सिंचन विहीर लाभार्थी सरपंच शंकरराव बाबुराव चाटे यांच्या संबंधित गट नंबरमध्ये जावून विहीरीच्या कामाची चौकशी करावी व त्या संबंधीचा अहवाल तातडीने तहसील कार्यालयात सादर करावा, असे या आदेशात तहसीलदारांनी म्हटले आहे़ १३ आॅगस्ट रोजी हे आदेश निर्गमित केले आहेत़ (वार्ताहर)मार्कआऊटनुसार विहिरचे काम : शंकरराव चाटे४१५ आॅगस्ट २०१५ रोजी ग्रामसभा घेऊन सिंचन विहीरच्या दहा प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली़ सदरील दहाही प्रस्ताव चाकूर पंचायत समितीकडे मंजुरीसाठी सादर केले होते़ पंचायत समितीने दहाही प्रस्ताव मंजूर केले़ गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चार विहीरचे काम सुरू करण्यात आले़ मार्कआऊट दिलेल्या ठिकाणी चार विहीरचे काम सुरू करण्यात आले़ सदरील विहीरीचे काम मजुरामार्फत करण्यात आले आहे़ या ग्रामसभेला विवेक बडे यांचे वडील माणिक बडेही हजर होते़ मात्र विवेक बडे यांनी खोटी तक्रार केली असल्याचे सरपंच शंकरराव बाबुराव चाटे यांनी म्हटले आहे़