शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य अभियंत्याच्या चौकशीसाठी पथक

By admin | Updated: February 14, 2015 00:13 IST

औरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी करून कारवाईचा अहवाल सादर करा, असे आदेश राज्याच्या अवर सचिवांनी दिले

औरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी करून कारवाईचा अहवाल सादर करा, असे आदेश राज्याच्या अवर सचिवांनी दिले होते. त्याप्रमाणे शिंदे यांच्या कार्यकाळातील कारभाराची मुंबईहून औरंगाबादेत दाखल झालेल्या तीन सदस्यीय समितीने चौकशी चालू केली आहे. शिंदे यांच्या कार्यकाळात परिमंडलामध्ये अनेक कामे करण्यात आली. त्या कामांची आणि कामात केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आली होती. विभागीय आयुक्तांनी या मागणीविषयी राज्याचे अवर सचिव एस. एस. शिरसीकर यांना पत्राद्वारे कळविले होते. सचिवांनी महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. शिंदे यांच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली होती. चौकशी समितीतील सदस्यांनी शुक्रवारी तक्रार केलेल्या नागरिकांचा जबाब नोंदविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी मे २०१३ मध्ये पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उभारणीसाठी फेज-१ योजनेत अनेक कामे नियमबाह्य केल्याच्या तक्रारी आहेत, शहरात भूमिगत वायरिंगसाठी ड्रम प्रोजेक्ट राबविण्यात आला; पण तो यशस्वी झाला नाही. त्यात अफरातफर केल्याचा आरोप शिंदे यांच्यावर आहे. जीटीएल आणि महावितरणमधील हस्तांतरण प्रक्रिया पारदर्शक झाली नाही आणि इतर लहान-मोठी कंत्राटे नियमबाह्य दिल्याच्या तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत.