शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

प्राप्तीकर विभागाच्या पथकाने स्थानिक अधिकाऱ्यांना ठेवले दूर!

By admin | Updated: April 1, 2016 00:57 IST

जालना : प्राप्तीकर विभागाच्या औरंगाबाद आणि पुण्यातील पथकाने जालना शहरात दोनवेळा विविध दुकाने आणि प्रतिष्ठाणांवर छापे टाकले.

जालना : प्राप्तीकर विभागाच्या औरंगाबाद आणि पुण्यातील पथकाने जालना शहरात दोनवेळा विविध दुकाने आणि प्रतिष्ठाणांवर छापे टाकले. पहाटेपर्यंत विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असली तर कारवाईतील तपशील कळू शकला नाही. तर दुसरीकडे स्थानिक अधिकाऱ्यांना या करवाईपासून दूर ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील शेतकरी, डॉक्टर व इतर अशा सुमारे ६ हजार जणांना प्राप्तीकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. तर तीन ते चार वर्षांपूर्वी पर्यंतच्या काही जुन्या प्रकरणांमध्येही व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्याने घबराटीचे वातावरण पसरले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून करदात्यांचे मानसिक खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप होत आहे. गेल्या चार वर्षांपासून जालना जिल्ह्यात दुष्काळामुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. तर दुसरीकडे प्राप्तीकरण विभागाच्या या भूमिकेमुळे व्यापाऱ्यांसह शेतकरी हैराण झाले आहेत. त्यातच आर्थिक वर्ष संपत आल्याच्या पार्श्वभूमीवर ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी जालना शहरात गेल्या पंधरा दिवसांत सहा ते सात प्रतिष्ठाणांवर प्राप्तीकरण विभागाच्या पथकाने छापे टाकले. पुणे आणि औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. या सर्व प्रक्रियेत स्थानिक अधिकाऱ्यांना मात्र दूर ठेवण्यात आले होते. कारण दोन्ही छाप्यांच्या वेळी जालनाचे प्राप्तीकर अधिकारी मोईओद्दिन गौस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कारवाईबाबत आपण अनभिज्ञ असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ही कारवाई झाल्याचे त्यांनी सांगितले. याचाच अर्थ छापे टाकण्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. छापे टाकण्यात आल्यानंतर पहाटेपर्यंत विविध कागदपत्रांची तपासणी संबंधित अधिकाऱ्यांनी केली. मात्र, आकड्यांची पडताळणी केली नसल्याचे समजते. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांना यापासून दूर ठेवण्यात आल्याने त्यांच्या कार्यपद्धतीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. अन्यथा तीन वर्षांपूर्वी प्राप्तीकर विभागाच्या पथकाने छापे टाकले होते. तेव्हा स्थानिक अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली होती. यंदा ती घेण्यात आल्याचे दिसून येत नाही. स्थानिक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त केली गेल्यानेच त्यांना या छाप्यापासून दूर ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.