शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

शिक्षक नियुक्त्यांत ‘शाळा’!

By admin | Updated: May 26, 2014 00:24 IST

बीड : जिल्हा परिषदच्या वस्तीशाळा शिक्षक नियुक्त्यांमध्येच ‘शाळा’ केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे़ बदल्या, पदोन्नत्या, दर्जावाढ ही संपूर्ण प्रक्रिया आचारसंहितेच्या कात्रीत आहे़

बीड : जिल्हा परिषदच्या वस्तीशाळा शिक्षक नियुक्त्यांमध्येच ‘शाळा’ केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे़ बदल्या, पदोन्नत्या, दर्जावाढ ही संपूर्ण प्रक्रिया आचारसंहितेच्या कात्रीत आहे़ तत्पूर्वीच जि़प़ ने काही निमशिक्षकांना शिक्षक म्हणून कायमस्वरुपी आदेश दिले आहेत तर बंद वस्तीशाळेवरील निमशिक्षकांपैकी काहींनाच नियुक्ती आदेश दिले आहेत़ त्यामुळे वस्तीशाळा शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवर्‍यात सापडल्या असून ‘सीईओं’चा हा प्रताप सध्या चर्चेचा विषय बनलाय. जिल्ह्यात एकूण वस्तीशाळा शिक्षकांची संख्या ६५० इतकी आहे़ याशिवाय विद्यार्थ्यांअभावी बंद पडलेल्या वस्तीशाळांवरील निमशिक्षकांचा आकडा १४७ इतका आहे़ शासनआदेशानुसार ज्या निमशिक्षकांनी डीएड पूर्ण केले आहे, त्यांची सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षक म्हणून नियुक्ती करायची होती़ तर बंद वस्तीशाळेवरील शिक्षकांना निमशिक्षक म्हणून कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या देऊन नंतर त्यांचे डीएड पूर्ण करुन घ्यायचे होते़ दरम्यान, जिल्ह्यात मुख्याध्यापकांची ४६९ पदे मंजूर आहेत़ १४७७ प्राथमिक पदवीधर तर ६९८८ सहशिक्षकांची पदे देखील मंजूर आहेत़ प्रत्यक्षात मात्र, ४१० मुख्याध्यापक, ४९९ प्राथमिक पदवीधर, ७३९७ सहशिक्षक कार्यरत आहेत़ महत्त्वाचे म्हणजे शंभरावर अतिरिक्त शिक्षकांनाही नियुक्तीची प्र्रतीक्षा आहे़ बदल्या, दर्जावाढ व पदोन्नत्या या प्रकिया पूर्ण झाल्यानंतर समायोजन केले जाणार होते; परंतु मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आणि आचारसंहितेमुळे सर्वच प्रक्रिया बंद झाली़ रिक्त जागा, उपलब्ध शिक्षक हे चित्र स्पष्ट नसताना जि़प़ ने ६५० पैकी २३८ निमशिक्षकांना शिक्षक म्हणून आदेश दिले आहेत़ आजही ४१२ निमशिक्षक शिक्षकपदाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत़ याशिवाय बंद वस्तीशाळा शिक्षकांना निमशिक्षक म्हणून सामावून घ्या, असे १ मार्च २०१४ च्या शासनादेशात म्हटले होते़ त्यानुसार जि़प़ ने १४७ पैकी केवळ १०९ जणांना निमशिक्षक म्हणून आदेश दिले आहेत़ त्यामुळे निमशिक्षकांना शिक्षक तर बंद वस्तीशाळेवर कार्यरत कर्मचार्‍यांना निमशिक्षक म्हणून नियुक्त्या देताना उर्वरित लोकांना का डावलले? याचे उत्तर गुलदस्त्यात आहे़ याबाबत शिक्षणाधिकारी (प्रा़) भास्कर देवगुडे म्हणाले, आरटीईमुळे शिक्षकांच्या जागा वाढल्या आहेत़ वस्तीशाळा शिक्षकांना नियुक्त्या देण्याचे शासनाचेच आदेश आहेत़ पदोन्नत्या, दर्जावाढ व समायोजन पूर्ण झाल्यानंतरच कुठल्या शाळेवर कुणाला नियुक्त करायचे याचे आदेश काढण्यात येतील़ सध्या फक्त सेवेत सामावून घेतल आहे़ जागा शिल्लक न राहिल्यास त्यांना नियुक्त्या दिल्या जाणार नाहीत़ आदेश जुन्या तारखेत? पदवधीर मतदारसंघाची आचारसंहिता २० मे रोजी लागू झाली़ २३८ निमशिक्षकांना शिक्षक म्हणून तर बंद वस्तीशाळांमधील १०९ जणांना निमशिक्षक म्हणून नियुक्तीआदेश २३ मे रोजी मिळाले़ आदेशावर १७ मे रोजीचा उल्लेख आहे़ १७ रोजी आदेश निघाले तर ते संबंधितांच्या हातात पडण्यास पाच दिवसांचा अवधी का लागला? याचे कोडेही कायम आहे़ जुन्या तारखेत आदेश काढल्याचे कागदावर दिसत असले तरी प्रत्यक्षात आचारसंहिता लागू झाल्यावर आदेश निघाले, असे एका अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले़ सीईओ म्हणाले, ९०० जागा रिक्त सीईओ राजीव जवळेकर यांनी सांगितले, जिल्ह्याला ३५२ प्राथमिक तर २२३ उच्च प्राथमिक शाळांना मान्यता मिळाली आहे़ या शाळांमध्ये प्रत्येकी दोन शिक्षक नियुक्त करायचे आहेत़ वस्तीशाळांमधील २३८ जणांना शिक्षक म्हणून आदेश दिले असले तरी देखील ९०० वर पदे रिक्त राहतात़ त्यामुळे नियुक्त्या देण्यात घाई झाली असे नाही़ याउलट आणखी बाहेरुन शिक्षक पाचारण करावे लागतील, अशी स्थिती असल्याचे ते म्हणाले़ नियुक्त्या पारदर्शकच आहेत़ त्यात आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा तथ्यहीन असल्याचा दावाही त्यांनी ‘लोकमत’कडे केला. (प्रतिनिधी) उलाढालीचा ‘आगळा’ ‘पांडव’ प्रताप जुन्या वस्तीशाळांमधील ६५० पैकी ४१२ व बंद वस्तीशाळेवरील १४७ पैकी २८ जणांनाच का डावलले? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे़ विश्वसनीय सूत्रांनुसार वस्तीशाळा शिक्षक नियुक्त्यांत सीईओंच्या भोवती फिरणार्‍या कर्मचार्‍यांनीच उशिरापर्यंतच्या बैठकांत खलबते करुन सार्‍या चाव्या फिरविल्या़ वस्तीशाळा शिक्षकांतील पुढार्‍यांसोबत संपर्क वाढवून ‘उलाढाली’चा ‘आगळा’ ‘पांडव’प्रताप करण्यात आल्याची माहिती आहे़