शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

वैद्यकीय बिलांसाठी शिक्षकांची पिळवणूक

By admin | Updated: May 10, 2016 00:54 IST

औरंगाबाद : सध्या वैद्यकीय प्रतिपूर्ती बिलांसाठी जि. प. शिक्षक त्रस्त आहेत. त्रुटी नसतानादेखील शिक्षकांना महिनोन्महिने वेठीस धरले जात असल्यामुळे ‘उपचारापेक्षा

औरंगाबाद : सध्या वैद्यकीय प्रतिपूर्ती बिलांसाठी जि. प. शिक्षक त्रस्त आहेत. त्रुटी नसतानादेखील शिक्षकांना महिनोन्महिने वेठीस धरले जात असल्यामुळे ‘उपचारापेक्षा आजार बरा’ म्हणण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. वैद्यकीय प्रतिपूर्ती बिलांसाठी निर्णायक प्रणाली राबवावी, याकडे शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांचे लक्ष वेधले. जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षक-कर्मचारी हे किंवा कुटुंबातील सदस्य आजारी पडला, तर ते खाजगी रुग्णालयात उपचार घेतात. त्यानंतर वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची बिले मिळविण्यासाठी ती संबंधित विभागाकडे सादर केली जातात. मात्र, विभागातील कर्मचारी जाणीवपूर्वक वैद्यकीय प्रतिपूर्तीची बिले निकाली काढण्यासाठी दिरंगाई करतात. मागील चार महिन्यांमध्ये एका शिक्षकाने हृदयाच्या आजारासाठी दवाखान्यात उपचार सुरू असून, वैद्यकीय प्रतिपूर्ती बिलांची आगाऊ रक्कम मिळण्यासाठी अर्ज केला होता. दरम्यान, सदरील शिक्षकाचा उपचाराअभावी मृत्यू झाला तरी जिल्हा परिषदेने ते बिल मंजूर केलेले नव्हते. यासंदर्भात शिक्षक सेनेचे म्हणणे आहे की, जिल्हा परिषदेत जणू दप्तर दिरंगाई हा कायदाच असून, तो सक्तीने राबविला जातो. जिल्हा परिषदेचे कर्मचारी वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या बिलांचे प्रस्ताव महिनोन्महिने अडगळीला टाकून देतात. त्रुटी नसतानाही ते प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी शिक्षकांना वेठीस धरतात. अगोदरच आजारपणात खर्च झालेल्या त्रस्त शिक्षकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक केली जाते. वैद्यकीय प्रतिपूर्ती बिलांच्या प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सकांची स्वाक्षरी घेतल्यानंतरही संबंधित प्रस्ताव पुन्हा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे विनाकारण पाठविले जातात. शिक्षकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी ‘सीईओं’नी लक्ष घालावे, असे साकडे शिक्षक सेनेने ‘सीईओं’ना घातले. शिष्टमंडळात शिक्षक सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रभाकर पवार, जिल्हाध्यक्ष दीपक पवार, जिल्हा सरचिटणीस सदानंद माडेवार, संतोष पाटील आढाव, लक्ष्मण ठुबे, महेश लबडे, विनोद पवार, अनिल काळे, शशिकांत बडगुजर आदींचा समावेश होता.