शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक करणार विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे शुटींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 23:55 IST

जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना विविध कलागुण अवगत असतात. परंतु ते उघड होत नसल्याने अनेक कलेत पारंगत असलेले विद्यार्थीही मागेच राहतात. मात्र आता असे होणार नाही. शिक्षण विभागाच्या वतीने जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मोबाइल अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा शोध घेऊन शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना विविध कलागुण अवगत असतात. परंतु ते उघड होत नसल्याने अनेक कलेत पारंगत असलेले विद्यार्थीही मागेच राहतात. मात्र आता असे होणार नाही. शिक्षण विभागाच्या वतीने जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मोबाइल अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा शोध घेऊन शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती केली जाणार आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढण्यास मदत होणार असल्याचे कार्यशाळेत सांगण्यात आले.जि. प. सभागृहात बुधवारी डायटच्या वतीने तंत्रज्ञ शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या आवाजाचे आॅडिओ कसे करावेत, व्हिडीओ कसा करावा यावर भूषण कुलकर्णी, एकनाथ कोर यांनी सखोल मार्गदर्शन केले. या उपक्रमाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता तर वाढेलच परंतु शाळेतील उपक्रमांचा व्हिडीओ पालकांनी पाहिल्यानंतर आपला पाल्य त्या व्हिडीओत दिसल्याने आनंद होणार आहे. जर पाल्य व्हिडीओत दिसला नाही तर आपलाही पाल्य असा झळकावा म्हणून पाल्याला शाळेत पाठविणार, त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढून त्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. तसेच उत्कृष्ट दर्जाचे व्हिडीओ किंवा आॅडिओ केंद्रांतर्गत येणाºया शाळेत दाखविले व ऐकविले जाणार आहेत. यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन करावे व त्यांच्यातील सुप्तगुण कसे ओळखावे याची माहिती देण्यात आली. मात्र शिक्षकांनीच जर हा उपक्रम यशस्वीपणे राबविला तर खरोखरच विद्यार्थी चमकल्याशिवाय राहणार नाहीत. नसता कार्यशाळा घेऊनही उपयोग होणार नाही.