शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आता दिवाळीनंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:41 IST

आंतर जिल्हा शिक्षकांच्या बदल्यांचा दुसरा टप्पा दिवाळीनंतर सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यावर्षी प्रथमच आॅनलाईन पद्धतीने होत असून बदलीपात्र शिक्षकांची प्रतिक्षा वाढली आहे़ यावर्षीचे अर्धे शैक्षणिक सत्र संपत आले असले तरी शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ कायम असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ दरम्यान, आंतर जिल्हा शिक्षकांच्या बदल्यांचा दुसरा टप्पा दिवाळीनंतर सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले़राज्य शासनाने यावर्षी आॅनलाईन बदल्या करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही प्रक्रिया पार पडण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागला आहे़ काही जिल्ह्यात शिक्षकांच्या बदल्या झाल्या असल्या तरी नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या रखडल्या आहेत़ जिल्हा परिषद शिक्षण विभागाने बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कोणत्याही क्षणी आॅनलाईन बदल्यांचे आदेश मिळण्याची प्रतिक्षा करण्यात येत आहे़ जिल्ह्यातील २१५ गावे अवघड क्षेत्रात समाविष्ठ आहेत़ २० जूननंतरच शिक्षकांच्या बदल्यांची आॅनलाईन प्रक्रिया सुरू होणार होती़ परंतु त्यानंतर अनेक तांत्रिक अडचणीमुळे बदल्यांची प्रक्रिया मंदावली होती़ जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची संख्या ७ हजार ७५८ असून पदवीधर शिक्षकांची संख्या साडेसातशे आहे़ मुख्याध्यापकांची संख्या ५४३ आहे़ प्राथमिक शिक्षकांच्या सवंर्ग १, २ व ३ याप्रमाणे बदल्या होणार आहेत़ त्यामध्ये पती- पत्नी एकत्रिकरण, आजारी, सर्वसाधारण या प्रमाणे सर्व बदलीपात्र शिक्षकांची माहिती पोर्टलद्वारे शासनास आॅनलाईन पाठविण्यात आली आहे़ विशेष संवर्ग शिक्षक भाग -१ मध्ये पक्षाघाताने आजारी कर्मचारी, अपंग कर्मचारी, ºहदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी, जन्मापासून एकच किडनी असलेले शिक्षक, कर्करोगाने आजारी, आजी, माजी सैनिक व अर्धसैनिक जवारांच्या पत्नी, विधवा, विधवा कर्मचारी, कुमारिका, परित्यक्ता, घटस्फोटीत महिला व वयाची ५३ वर्ष पूर्ण केलेले कर्मचारी़ विशेष संवर्ग २ मध्ये पती, पत्नी एकत्रिकरण व १० वर्ष पूर्ण झालेले शिक्षक बदलीसाठी पात्र राहणार आहेत़दरम्यान, शासनाच्या या निर्णयाविरूद्ध काही शिक्षक संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत़ या याचिकांच्या व शासनाच्या निर्णयाची प्रतिक्षा करण्यातच मागील काही महिन्यापासून शिक्षकांचा वेळ गेला आहे़ त्यामुळे बदलीसाठी पात्र असलेल्या काही शिक्षकांची मानसिकता शैक्षणिक वातावरणात रमण्यास तयार नाही़ याचा परिणाम संबंधित शाळेवर होत असून विद्यार्थ्यांच्या गुणवतेचा प्रश्न निर्माण झाला आहे़