शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्तावाढीसाठी ‘शिक्षकमित्र’ उपक्रम

By admin | Updated: September 2, 2014 01:49 IST

कळमनुरी : इंग्रजी व गणित विषयाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आता चालू शैक्षणिक वर्षापासून ‘शिक्षकमित्र’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शिक्षकांना जिल्हास्तरावर मार्गदर्शन

कळमनुरी : इंग्रजी व गणित विषयाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आता चालू शैक्षणिक वर्षापासून ‘शिक्षकमित्र’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शिक्षकांना जिल्हास्तरावर मार्गदर्शन करण्यात येणार असून पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबविला जात आहे. विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजीचे ज्ञान आत्मसात व्हावे, त्यांना या विषयाची भीती वाटू नये, शिक्षकांनाही हा विषय सुलभतेने शिकविता यावा, यासाठी हा शिक्षकमित्राचा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी दिली. या उपक्रमाअंतर्गत तज्ज्ञ मार्गदर्शकांना जिल्हास्तरावर २८ आॅगस्ट रोजी मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक बीट स्तरावर पहिली ते पाचवीचे ३ फुल व सहावी ते आठवीला शिकविणाऱ्या शिक्षकांचे दोन गट तयार करण्यात येणार आहेत. शिक्षकांची बैठक व्यवस्था होईल अशाच शाळेवर हे बीट स्तर प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात गणित व इंग्रजी विषयातील त्या-त्या महिन्याच्या वार्षिक नियोजनानुसार येणारे आशयातील कठीण संबोध संकल्पना यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी सनियंत्रण अधिकाऱ्यांच्या व सहाय्यक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कळमनुरीसाठी विस्तार अधिकारी एस. बी. सोनुने, डोंगरकड्यासाठी एन. बी. बळवंते, वडकुते, नरवाडे यांची नांदापूर बीटसाठी गंगावणे, डवरे यांची तर शेवाळ्यासाठी पी. जी. भोसले, एम. डी. नरवाडे, बालाजी गोरे यांची निवड करण्यात आली आहे. कन्या कळमनुरीचे प्रशिक्षण प्रशाला कळमनुरी डोंगरकडा बीटचे प्रशाला डोंगरकडा, नांदापूर बीटचे कें. प्रा. शा. नांदापूर शेवाळा बीटचे प्रशाला आखाडा बाळापूर येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणाला शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आदी भेटी देऊन वेळोवेळी पाहणी करणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांबरोबरच ग्रामीण भागात चांगले शिक्षण मिळत नसल्याची ओरड होत आहे. दहावीच्या निकालामध्येही अनेक शाळा मागे पडल्याचे दिसून आले. अशा स्थितीत शिक्षण विभागाच्या वतीने नवनवीन उपक्रम राबवून गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राबविण्यात येत असलेल्या ‘शिक्षकमित्र’ उपक्रमामुळे निश्चित ही स्थिती बदलेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)