माणकेश्वर : शिक्षकांची रिक्त पदे भरण्याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे येथील पालकांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेला टाळे ठोकले. त्यामुळे शिक्षण विभागाने याची दखल घेत तातडीने दोन शिक्षकांची नियुक्ती केल्यामुळे पालकांच्या आंदोलनाला यश आले. भूम तालुक्यातील माणकेश्वर येथे जिल्हा परिषदेचे उर्दू हायस्कूल असून, मागील तीन वर्षांपासून या शाळेत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शिक्षकांची पदे भरण्याबाबत वारंवार मागणी करूनही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी पहिल्याच दिवशी शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला होता. मात्र नवीन शैक्षणिक वर्षात देखील शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नसल्यामुळे बुधवारी सकाळीच पालकांनी या शाळेला टाळे ठोकले.यावेळी विस्ताराधिकारी खराडे यांनी शाळेला कुलूप ठोकल्याची माहिती भ्रमणध्वनीवरून वरिष्ठांना दिल्यानंतर कळंब आणि शिराढोण येथे अतिरिक्त असलेल्या उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना तातडीने माणकेश्वरमध्ये रुजू होण्याचे आदेश दिले. त्यानुसार हे शिक्षक शाळेवर आल्यानंतर पालकांनी टाळे काढले.
टाळे ठोकताच मिळाले शिक्षक
By admin | Updated: June 16, 2016 00:08 IST