शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शालेय शिक्षणमंत्र्यांच्या शुभेच्छापत्राने भारावले शिक्षक

By admin | Updated: September 8, 2014 00:34 IST

औरंगाबाद : शहरातील शिक्षकांना शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सुखद धक्का दिला. त्यांनी दिलेल्या शुभेच्छापत्राने शिक्षक भारावून गेले आहेत़

औरंगाबाद : शहरातील शिक्षकांना शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सुखद धक्का दिला. त्यांनी दिलेल्या शुभेच्छापत्राने शिक्षक भारावून गेले आहेत़ शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शालेय, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांना शुभेच्छापत्र लिहून सुखद धक्का दिला़‘आजचा शिक्षक स्वयंप्रकाशी असला तरच उद्याचा दिवस उजळ असेल,’ असा संदेश देत शिक्षणमंत्र्यांनी ज्ञानदानाचे महान कार्य करणाऱ्या शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे काम केले आहे़ ५ सप्टेंबर माजी राष्ट्रपती डॉ़ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो़ शालेय शिक्षणमंत्री दर्डा यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांना पत्र पाठविली़ मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांमध्ये पत्र लिहून ते ५ सप्टेंबर रोजी शिक्षकांना देण्यात आले़ शिक्षक दिनानिमित्त जेव्हा खुद्द शिक्षणमंत्र्याचेच शुभेच्छापत्र आले, तेव्हा आमच्या आनंदाला पारावार उरला नाही, अशी प्रतिक्रिया शिक्षकांतून उमटली़ राज्याच्या शिक्षणमंत्र्यांकडून आलेले पत्र संपूर्ण गावाला वाचून दाखविताना आपण शिक्षक असल्याचा अभिमान होत असल्याचे अनेकांनी नमूद केले.शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी यापूर्वी राज्यातील दहावी, बारावीच्या ७ हजार ६२३ गुणवंत विद्यार्थ्यांना अभिनंदनाचे पत्र लिहून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली होती़ तसाच उपक्रम शिक्षकांसाठी राबवून शहरातील ६ हजार ५०० च्या वर शिक्षकांना शुभेच्छापत्र लिहिले आहे़ शिक्षणमंत्र्यांनी शुभेच्छापत्राद्वारे शिक्षकांशी संवाद साधला असून त्यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांचे मित्र बनण्याचा सल्ला दिला़ काय लिहिले पत्रात?शिक्षक हा माणूस घडवितो आणि पर्यायाने समाज़ माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असला, तरी त्याचे विद्यार्थीपण जागवत ते टिकवून ठेवण्याची कला तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवता़ त्यांच्या रूपाने देशाचे भवितव्य तुमच्या हाती असते आणि या भविष्याला आकार देण्याचे उदात्त काम तुम्ही करता़ या विद्यार्थ्यांना ज्ञानवंत आणि गुणवंत बनवायचे; पण त्यासोबत विज्ञानाची दृष्टी देत विवेकाचीही जोड द्या़ कारण या देशाच्या महान परंपरेचा प्रवाह अखंडित राहील़ आजचा शिक्षक स्वयंप्रकाशी असला तरच उद्याचा दिवस उजळ असेल, असे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शुभेच्छापत्रात लिहिले आहे़