शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बदलीच्या धसक्याने शिक्षकाचा मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:33 IST

बदलीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांपासून नेट कॅफेवर जागरण आणि बदलीचा ताण सहन न झाल्यामुळे साळेगाव केंद्रातील मांगवडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक मधुकर दत्तात्रय साळवे (४९) यांचा हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : बदलीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांपासून नेट कॅफेवर जागरण आणि बदलीचा ताण सहन न झाल्यामुळे साळेगाव केंद्रातील मांगवडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक मधुकर दत्तात्रय साळवे (४९) यांचा हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.शिक्षकांच्या बदलीसाठीचे आॅनलाईन फॉर्म भरण्यासाठी वेब साईट व्यवस्थित न चालणे आणि बदली अर्ज भरण्यासाठीचे शिक्षण विभागाचे पोर्टल बंद पडणे, यामुळे मागील दोन दिवसांपासून मधुकर सावळे हे इंटरनेट कॅफेवर जागरण आणि बदली कोठे होणार या भीतीच्या मानसिक तणावात होते.बुधवारी दुपारी ४ वाजता त्यांना अस्वस्थता जाणवू लागली आणि चक्कर येत असल्याने त्यांना कळंब (जि. उस्मानाबाद) येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर बार्शी येथे हलविण्यात येत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर कळंब येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.