शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आगामी निवडणुकीत सरकारला धडा शिकवा -छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:20 IST

 वैजापूरच्या मेळाव्यात केंद्र व राज्य सरकारवर टीका

वैजापूर : न्याय मागितला तर तुरुंगात टाकणारे हे सरकार आहे. देशात मंदिर, मशीद व राज्यात मराठा-ओबीसींंमध्ये फूट पाडून त्यांना मते मिळवायची आहेत. अच्छे दिनची भाषा करून शेतकरी, सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या या सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन समता परिषदेचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी वैजापूर येथे केले.सोमवारी येथील जि. प. शाळेच्या मैदानावर आयोजित समता मेळावा व बहुजन परिषदेत ते बोलत होते. या कार्यक्रमाला समता सैनिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रारंभी भुजबळ यांच्या हस्ते विषमता निर्माण करणाºया मनुस्मृती या ग्रंथाचे दहन करण्यात आले. त्यानंतर भुजबळ यांनी मनुस्मृतीवर टीका करत आताही देशात एक प्रकारे मनुवृत्ती जागी झाली असून उसळी मारत आहे. समतेचे चक्र उलटे फिरत असल्याचे सांगितले.संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांनी समतेचा संदेश दिला. फुले, शाहू, आंबेडकरांनी विज्ञानाची कास धरण्यास सांगितले; पण आज संभाजी भिडेसारखी माणसं संतती होण्यासाठी आंबे खाण्याचा सल्ला देतात. कायद्याचा आज संकोच होतोय असे सांगत त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर चौफेर फटकेबाजी केली.साठ वर्षांच्या लढाईनंतर ओबीसींना २७ टक्के आरक्षण मंडल आयोगामुळे मिळाले; पण आता मराठा आरक्षणामुळे या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी आमची भूमिका आहे. ओबीसींची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची जनगणना करा, अशी मागणी त्यांनी केली. मांजरपाडा भागात डोंगरावर पडणारे पाणी गुजरातमध्ये जात असल्याने हे पाणी बोगदा करून मराठवाड्यात वळवण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.मोदींची नक्कल२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे भाषण केले होते. त्या भाषणात मोदींनी महाराष्ट्रातील शेतकºयांना कांदा व कापूस या पिकांबद्दल कसे आश्वासन दिले होते, याची हुबेहुब नक्कल भुजबळ यांनी करून दाखविली. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये हंशा पिकला. हे लोक हनुमानाची जात काढत आहेत. तेव्हा उद्या ३३ कोटी देवांच्या जाती ठरवून वर्गवारी करावी लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :PoliticsराजकारणOBCअन्य मागासवर्गीय जाती