शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला धडा शिकवा : मांतग आरक्षण परिषदेत ठराव

By admin | Updated: September 13, 2014 23:52 IST

नांदेड : मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने कोणतीही भूमिका घेतली नाही़ त्यामुळे मातंग समाजाने सरकारला धडा शिकवावा,

नांदेड : मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने कोणतीही भूमिका घेतली नाही़ त्यामुळे मातंग समाजाने सरकारला धडा शिकवावा, असे आवाहन मातंग आरक्षण हक्क परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या विभागीय बैठकीत मातंग समाजातील नेत्यांनी केले़ ताज पाटील हॉटेल येथे शनिवारी आयोजित केलेल्या बैठकीस मानवी हक्क अभियानचे अ‍ॅड़ एकनाथ आव्हाड, दलित महासंघाचे प्रा़ मच्छिंद्र सकटे, माजी आ़ अविनाश घाटे, अ‍ॅड़ दयानंद भांगे, डॉ़ माधव गादेकर, प्रा़ जी़ एस़ वाघमारे, दिलीप आगळे, मारोती वाडेकर, संभाजी मंडगीकर, अ‍ॅड़ रानवळकर, लालबाजी घाटे, शिवा कांबळे, गणेश तादलापूरकर, श्याम कांबळे यांची उपस्थिती होती़ सरकारने मातंग समाजावर अन्याय केला़ त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मातंग समाजाने संघटित होऊन मताचा उपयोग शस्त्र म्हणून करावा, असे आवाहन प्रा़ सकटे यांनी केले़ अ‍ॅड़ एकनाथ आव्हाड यांनी, मातंग समाज व तत्सम जातींना आरक्षण द्यावे़ यासाठी १३ टक्के व पूर्वीचे ३ टक्के असे मिळून अनुसूचित जातीच्या १६ टक्के आरक्षणात अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्याची मागणी केली़ अ‍ॅड़ भांगे यांनी आरक्षणाबाबत काही तांत्रिक व कायद्याच्या बाबी स्पष्ट केल्या़ लोकसंख्येच्या आधारावर मातंग आरक्षणाची मागणी न्यायिक व कायद्याच्या चौकटीत बसणारी असल्याचे ते म्हणाले़ मातंग समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्यभर आंदोलन करणार असल्याची भूमिका परिषदेचे निमंत्रक अविनाश घाटे यांनी व्यक्त केली़ प्रारंभी सादर केलेला क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास आयोग ग्राह्य धरावा तसेच मातंग समाजाच्या राजकीय अस्तित्वासाठी सर्वच नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन राजकीय पक्षाची स्थापना करावी, असा ठराव परिषदेत घेण्यात आला़ बैठकीस प्रा़ कन्हैया पाटोळे, लालसेनेचे गणपत भिसे, बबन शिर्के, रामचंद्र भरांडे, के़ डी़ उफाडे, सतीश कवडे, प्रा़ शंकर गड्डमवार, रविंद्र भालेराव, नामदेव गुंडीले, श्याम गडंबे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)