शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पालिकांच्या तिजोरीत सव्वा कोटीवर कर..!

By admin | Updated: November 16, 2016 00:08 IST

उस्मानाबाद : शासनाने पाचशे- हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या असल्या तरी २४ नोव्हेंबर पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर जुन्या नोटांमधून भरण्याची मुदत दिली आहे़

उस्मानाबाद : शासनाने पाचशे- हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या असल्या तरी २४ नोव्हेंबर पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर जुन्या नोटांमधून भरण्याची मुदत दिली आहे़ ११ ते १४ नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील ८ पालिका व दोन नगर पंचायतींकडे तब्बल एक कोटी ३७ लाख ९५ हजार ५९८ रूपयांचा कर जमा झाला आहे़ तर पुढील आठ दिवसात या करामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे़केंद्र शासनाने हजार-पाचशे रूपयांच्या नोटा ७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीपासून चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली़ विशेषत: दोन नंबर धंदे आणि पैशांचा काळाबाजार करणाऱ्यांची झोपच उडाली आहे़ बाजारपेठेत जुन्या हजार-पाचशेच्या नोटा स्विकारल्या जात नाहीत़ त्यामुळे सर्वसामान्य नागरिक बेजार झाले आहेत़ असे असले तरी शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर या जुन्याा नोटांमधून भरण्याची मुदत दिली होती़ याची संधी साधत जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी जिल्ह्यातील ८ नगर पालिका व २ नगर पंचायतींकडे तब्बल १ कोटी ३७ लाख ९५ हजार ५९८ रूपयांचा कर भरला आहे़ पहिल्या दिवशी तब्बल ७३ लाख ४२ हजार ११७ रूपयांचा कराचा भरणा झाला़ यात उस्मानाबाद पालिकेत ३० लाख २८ हजार ७०० रूपये, तुळजापूर पालिकेत १० लाख ७३ हजार ९१७ रूपये, नळदुर्ग पालिकेत ४९ हजार ७०० रूपये, भूूम पालिकेत ४ लाख ११ हजार रूपये, कळंब पालिकेत ४ लाख ९४ हजार ८०० रूपये, परंडा पालिकेत ३ लाख ५३ हजार, उमरगा १४ लाख ७१ हजार, मुरूम ४ लाख, वाशी ४ लाख ४८ हजार तर लोहारा नगर पंचायतीत २३ हजार असा ७३ लाख ४२ हजार ११७ रूपयांचा भरणा झाला़दुसऱ्या दिवशी १२ नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद पालिकेत ८ लाख १७ हजार ९०० रूपये, तुळजापूर पालिकेत ३ लाख १७ हजार ९१७ रूपये, नळदुर्ग पालिकेत ७६ हजार, भूूम पालिकेत १ लाख २ हजार, कळंब पालिकेत ३ लाख ५२ हजार, परंडा पालिकेत १ लाख ६० हजार, उमरगा २ लाख ७८ हजार, मुरूम ९५ हजार, वाशी २ लाख ३४ हजार तर लोहारा नगर पंचायतीत ९५ हजार असा २५ लाख २७ हजार ८१७ रूपयांचा भरणा झाला़ १३ नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद पालिकेत ५ लाख २५ हजार ८०० रूपये, तुळजापूर पालिकेत १ लाख ७५ हजार ७६६, नळदुर्ग पालिकेत १२ हजार ४००, भूूम पालिकेत ६९ हजार, कळंब पालिकेत १ लाख ८३ हजार, परंडा पालिकेत ७६ हजार, उमरगा १ लाख १८ हजार, मुरूम ५० हजार, वाशी ५३ हजार तर लोहारा नगर पंचायतीत २५ हजार असा १२ लाख ८८ हजार ६६६ रूपयांचा भरणा झाला़१४ नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद पालिकेत १५ लाख ५९ हजार ५०० रूपये, तुळजापूर पालिकेत ३ लाख ५ हजार २९८, नळदुर्ग पालिकेत १३ हजार ६००, भूूम पालिकेत ७७ हजार, कळंब पालिकेत ३ लाख ७३ हजार, परंडा पालिकेत १ लाख ६० हजार, उमरगा ७८ हजार ६००, मुरूम २५ हजार, वाशी ११ हजार तर लोहारा नगर पंचायतीत ३४ हजार असा २६ लाख ३६ हजार ९९८ रूपयांचा भरणा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़ येणाऱ्या काळात ही रक्कम आणखी वाढणार आहे.(प्रतिनिधी)