शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

कर भरणाऱ्यांना दुचाकी

By admin | Updated: December 23, 2014 00:16 IST

वाळूज महानगर : नागरिकांकडे असलेल्या थकित मालमत्ता कराच्या वसुलीसाठी रांजणगाव ग्रामपंचायतीने कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांतून ‘लकी ड्रॉ’ काढून ‘भाग्यवान’ नागरिकांना

वाळूज महानगर : नागरिकांकडे असलेल्या थकित मालमत्ता कराच्या वसुलीसाठी रांजणगाव ग्रामपंचायतीने कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांतून ‘लकी ड्रॉ’ काढून ‘भाग्यवान’ नागरिकांना दुचाकी व कचरा भरण्यासाठी बादली देण्याचा निर्णय घेतला आहे.वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सर्वांत मोठी लोकसंख्या असलेल्या रांजणगावातील नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात कर थकला आहे. यामुळे सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीला आर्थिक चणचणींचा सामना करावा लागतो. औद्योगिक वसाहतीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गरीब कामगारवर्ग वास्तव्यास असून, त्यांना नागरी सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीची दमछाक होते. कराच्या वसुलीसाठी ग्रामपंचायतीने राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोदा ग्रामपंचायतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कर वसुलीसाठी अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पाटोदा ग्रामपंचायतीतर्फे आगाऊ करांचा भरणा करणाऱ्या नागरिकांना दरवर्षी संसारोपयोगी साहित्य तसेच नियमित कर भरणाऱ्यांना मोफत दळण दळून दिले जाते. यापासून प्रेरणा घेऊन रांजणगाव ग्रामपंचायतीने कर वसुलीसाठी नवीन फंडा अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीअंतर्गत जवळपास १३ हजार मालमत्ताधारक असून, पाच हजारांपुढील थकित कर भरणाऱ्या नागरिकांना कचरा साठवून ठेवण्यासाठी डस्ट बिन देण्यात येणार आहे. सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनीही पुढाकार घेऊन थकित करांचा भरणा करण्याचे आवाहन ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव, दत्तू हिवाळे, सुभाष गोरे, जयश्री कोळेकर, सुनीता थोरात, अब्दुल अजीम, सुभाष सोनवणे, सुभद्राबाई बटुळे, संजय मंजुळे, उत्तमराव कानडे, लताबाई फाळके, उषाबाई शेजूळ, गोरखनाथ हिवाळे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.४संपूर्ण थकित कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांसाठी सोडत काढून भाग्यवान करदात्यांना प्रजासत्ताक दिनी दुचाकी भेट देण्यात येणार असल्याचे सरपंच कांताबाई जाधव, उपसरपंच भारत पा.गरड, ग्रामविकास अधिकारी नानासाहेब मतसागर यांनी सांगितले.