शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
3
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
4
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
5
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
6
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
7
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
8
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
9
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
10
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
11
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
13
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
14
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
15
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
16
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
17
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
18
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
19
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
20
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

कर भरणे हे सामाजिकदायित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 18:59 IST

कर भरणे प्रत्येक नागरिकाचे सामाजिकदायित्व आहे. याकरिता कर चुकविण्याची मानकिता बदलून नागरिकांनी स्वत:हून कर भरावा, असे आवाहन आयकर विभागाचे प्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव यांनी केले. 

ठळक मुद्देआयसीएआयची स्थानिक शाखा व डायरेक्ट टॅक्स कमिटीच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन आयकर विभागाचे प्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव यांनी केले. मार्च ते सप्टेंबर २०१६ दरम्यान औरंगाबाद विभागात ५०० कोटींची अघोषित संपत्ती जाहीर झाली आहे३ लाख ५५ हजार करदाते असून, मागील वर्षात यात नवीन दीड लाख करदात्यांचा समावेश

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद : देशाची सुरक्षा,सुविधा, विकासकामे करायची असतील तर सरकारच्या तिजोरीत मोठ्याप्रमाणात महसूल जमा होणे आवश्यक आहे. यामुळे कर भरणे प्रत्येक नागरिकाचे सामाजिकदायित्व आहे. याकरिता कर चुकविण्याची मानकिता बदलून नागरिकांनी स्वत:हून कर भरावा, असे आवाहन आयकर विभागाचे प्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव यांनी केले. 

 आयसीएआयची स्थानिक शाखा व डायरेक्ट टॅक्स कमिटीच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन  शनिवारी सकाळी त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळीस त्यांनी उपस्थित चार्टड अकाऊंटंटला समाजात करभरण्या विषयी जनजागृती करण्यासाठी आवाहन केले. सातारा परिसरातील आयसीएआय भवन आयोजित परिषदेत. डायरेक्ट टॅक्स कमिटीचे उपअध्यक्ष सीए एन.सी.हेगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर श्रीवास्तव यांनी सांगितल की, मार्च ते सप्टेंबर २०१६ दरम्यान औरंगाबाद विभागात ५०० कोटींची अघोषित संपत्ती जाहीर झाली आहे, मागील आर्थिक वर्षात विभागाने ११०० कोटींचे करसंकलन के ले आहे. ३ लाख ५५ हजार करदाते असून, मागील वर्षात यात नवीन दीड लाख करदात्यांचा समावेश झाल्याची माहिती त्यांनी दिली. प्रारंभी, स्वागतपर भाषण सीए संघटनेचे अध्यक्ष अल्केश रावका व सीए उमेश शर्मा यांनी केले. सूत्रसंचालन प्रणव राठी, गौरी पंडीत यांनी तर पंकज सोनी यांनी आभार मानले. या परिषदेच्या रविवारी शेवटचा दिवस असून यात अ‍ॅड. कपिल गोयल,सीए चंद्रशेखर चितळे, सीए एम.आर. हुंडीवाला, सीए चैतन्य के.के.,सीए जगदीश पंजाबी यांचे मार्गदर्शन करीत आहे.  आयसीडीएसची अंमलबजावणी त्रासदायकसीए संघटनेच्या डायरेक्ट टॅक्स कमिटीचे उपअध्यक्ष एन.सी.हेगडे यांनी सांगितले की, इन्कम कॉप्युटेशन अ‍ॅण्ड डिस्कोलजर (आयसीडीएस) ची अंमलबजावणी करदात्यांसाठी अत्यंत त्रासदायक ठरत आहे. मुळात सीए असोसिएशनचे कंपनी लॉ नुसार निकष असतानाही आयकर विभागाने आयकरनुसार उत्पन्न कसे काढावे यासाठी यात निकष घालून दिले आहे. यामुळे काम वाढले आहे. यामुळे आयसीडीएस वादग्रस्त मुद्दा बनला आहे. याचा आयकर विभागाच्या महसूलात जास्त वाढ होणार नाही. मात्र, यामुळे अनेक तांत्रिक अडचणी वाढल्या आहेत. मात्र, करदात्यांना तोंड द्यावे लागणार आहे. करप्रणाली सुलभी करण्याचा उद्देश सफल होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.