शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

...तर २०२४ नंतर मोदी निवडणुका होऊ देणार नाहीत : भाई वैद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 22:50 IST

नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आक्रमक टीका करीत जातीयवादी शक्तींविरोधात लढण्यासाठी सर्व दलित व वंचितांना मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले

मयूर देवकर औरंगाबाद, दि. 27 - ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आक्रमक टीका करीत जातीयवादी शक्तींविरोधात लढण्यासाठी सर्व दलित व वंचितांना मतभेद विसरून एक त्र येण्याचे आवाहन केले. ‘फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रबोधन परिषदे’तर्फे गुरुवारी (दि.२७) आयोजित ‘संघर्ष परिषदे’मध्ये ते बोलत होते.‘पुरोगामी, डाव्या आंबेडकरी चळवळींसमोरील आव्हाने’ या विषयावर बोलताना त्यांनी केंद्र सरकारची तुलना हिटलरच्या हुकूमशाहीशी केली. ते म्हणाले, ज्या प्रकारे हिटलरने विरोधकांना समूळ नष्ट करून स्वत:चे अराजक साम्राज्य स्थापित केले, त्याच्याशी साम्य असणारी परिस्थिती सध्या भारतात आहे. संघप्रणीत मोदी सरकारचे दडपशाहीचे धोरण पाहता २०१९ मध्ये जर त्यांचा विजय झाला, तर २०२४ नंतर आपल्या देशात निवडणुका होणार नाहीत, अशी भीती वाटते. लोकशाहीचे भवितव्य धोक्यात आले आहे.भारताला हिंदू राष्ट्र करताना भारतीय समाजव्यवस्थेचा पाया असलेली राज्यघटना बदलण्यासही संघ कचरणार नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे नाझी साम्राज्याचा बीमोड करण्यासाठी मित्र देश एकत्र आले होते, त्याप्रमाणे समाजातील सर्व गोरगरीब, मागास, वंचित, पीडित, दलित, परिवर्तवादी, समाजवादी, डावे यांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र लढण्याची गरज आहे. तरच हे धोकादायक आव्हान पेलले जाऊ शकते, असे वैद्य म्हणाले. उपेक्षितांच्या संघर्षाबाबत सुभाष लोमटे म्हणाले की, एकाच विचारांसाठी लढणाºया विविध संघटनांचे विघटन जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत भांडवलशाही व जातीयवादी शत्रूशी दोन हात करता येणार नाहीत. डॉ. भालचंद्र कांगो म्हणाले की, लोकशाहीमध्ये अपप्रवृत्तींचा शिरकाव झाल्याने दडपशाही करून अल्पसंख्याकांना दुर्बल केले जात आहे. ३९ वर्षांपूर्वी २७ जुलै रोजी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव विधानसभेत पारित झाला होता. त्याचे औचित्य साधून गुरुवारी संत तुकाराम महाराज नाट्यगृहात ‘संघर्ष परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रतिभा अहिरे होत्या. यावेळी मंचावर रमेश खंडागळे, मिलिंद पाटील, अजमल खान, भीमराव सोनवणे, लक्ष्मण जाधव पाटील, राम बाहेती, अण्णा खंदारे, वर्षा गुप्ते आदींची उपस्थिती होती.हा इतिहास का सांगत नाही?

नरेंद्र मोदी वेद-पुराणांतील कथांचे दाखले देऊन भारतात कशी संपूर्ण जगाला ज्ञान देण्याची, आदर्श नेतृत्व प्रदान करण्याची क्षमता आहे याचा सगळीकडे प्रचार करतात. मात्र, आमच्या देशात हजारो वर्षांपासून दलितांवर किती अत्याचार आणि अन्याय केला जातोय याविषयी ते का बोलत नाहीत? असा प्रश्न उपस्थित करून जागतिक मानव विकास निर्देशांकात भारताचा १३४ वा क्रमांक आहे याकडे भाई वैद्य यांनी लक्ष वेधले.