शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नळाला मीटर; ‘थ्रीजीं’चा यू-टर्न

By admin | Updated: January 2, 2017 23:56 IST

लातूर : महापालिकेने नळाला मीटर बसविण्याची निविदा काढून कामाला प्रारंभ झाले तेव्हा विरोध करणाऱ्या नागरिक हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांचा आता विरोध मावळला

लातूर : महापालिकेने नळाला मीटर बसविण्याची निविदा काढून कामाला प्रारंभ झाले तेव्हा विरोध करणाऱ्या नागरिक हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांचा आता विरोध मावळला असून सोमवारी त्यांनी आपल्या स्वत:च्या घरी बाजारातून आणून नवीन मीटर बसवून घेतले आहे़ महापालिकेने गळती बंद करून अनधिकृत नळधारकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही समितीचे अ‍ॅड. मनोहरराव गोमारे, अशोक गोविंदपूरकर व अ‍ॅड. उदय गवारे या ‘थ्रीजीं’नी केली आहे.यापूर्वी नळाला मीटर बसविण्याचा प्रयत्न मनपाने केला होता. मात्र नागरिक हक्क समिती स्थापन करून अ‍ॅड. मनोहरराव गोमारे, अशोक गोविंदपूरकर, अ‍ॅड. उदय गवारे यांनी विरोध केला होता. आता या ‘थ्रीजीं’नी यू-टर्न घेत नळाला मीटर बसविण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र दर आकारणीला विरोध केला आहे.मनपाने यापूर्वी नळाला मीटर बसविण्यासाठी काढलेल्या निविदेतील दर अवाजवी असल्याचे लक्षात आल्याने समितीने याला विरोध करीत आयुक्तांना निवेदन दिले होते़ बाजारात वाजवी दरात मिळणारे मीटर बसविण्याची ग्राहकांना मुभा द्यावी, अशी मागणी केली होती़ सध्या मनपाच्या सर्व परिमानाचे मीटर ९७५ ते ११०० रूपयांपर्यंत मिळत आहेत़ सदरील मीटर हे ग्राहकांना परवडणारे आहेत़ मनपाने २० जानेवारीपर्यंत ग्राहकांनी स्वत:हून मीटर बसवून घेण्याचे आवाहन केले आहे़ त्यानुसार सोमवारी नागरिक हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मीटर बसविण्यास आमचा विरोध नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर अशोक गोविंदपूरकर यांच्या घरी या थ्रीजींच्या उपस्थितीत नळाला मीटर बसविण्यात आले. निवडणुकीच्या तोंडावर हा यू-टर्न घेतल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)