शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतचे उधारीवर नळ कनेक्शन

By admin | Updated: April 29, 2017 00:52 IST

मंठा : शहरातील नवीन पाणी पुरवठा योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाली असून, शहरात विविध भागांत पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

मंठा : शहरातील नवीन पाणी पुरवठा योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाली असून, शहरात विविध भागांत पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे एक हजार नागरिकांनी नवीन नळ कनेक्शन घेतले आहे. त्यापैकी ७०० नगदी तर ३०० उधारीवर देण्यात आल्याने अडचणीत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.मंठा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पातून आणण्यात आलेल्या नवीन नळयोजनेचे मुबलक पाणी शहरवासियांना मिळत असल्याने १२ महिने पाणी टंचाईचा सामना करावा लागणाऱ्या मंठेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील सर्वच प्रभाग व नवीन वस्त्यांमध्ये नळयोजनेच्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. तर नव्याने सुमारे साडेसहा किलोमीटर पाईपलाईन करण्यात आली आहे. तर आणखी अडीच कि़मी. पाईपलाईनचे काम सुरू असल्याचे नगराध्यक्षा पार्वती बोराडे यांनी सांगितले.या नळजोडणीमुळे नगर पंचायतचे उत्पन्न वाढले असून, यापोटी सुमारे ७०० कनेक्शन प्रत्येकी ३००० रुपये प्रमाणे २१ लाख रुपये मिळाले आहेत. उधारीवरील ३०० कनेक्शनची रक्कम ९ लाख रुपये आठवडाभरात मिळेल, असा विश्वास नगराध्यक्षा बोराडे यांनी व्यक्त केला. नवीन नळांना मुबलक पाणी येत असल्याने कनेक्शनची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे मत उपनगराध्यक्ष बालासाहेब बोराडे यांनी व्यक्त केले. शहरात दररोज किमान ४५ ते ६० मिनिट पाणी सोडण्यात येत आहे. उन्हाळ्यात मुबलक पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे. नळयोजनेसाठी खोदण्यात आलेले मुख्य रस्त्यावरील चरी व्यवस्थित न बुजवल्याने नागरिकांना मोठा त्रास होत असून, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.