शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

‘तिला’होते परीक्षेचे टेन्शन

By admin | Updated: June 18, 2016 01:04 IST

औरंगाबाद : ‘प्रिय आई- बाबा मी परीक्षेला सामोरे जाऊ शकत नाही. डॉक्टर होण्याची माझ्यात क्षमता नाही. सर्वांच्या अपेक्षांना मी तडा देऊ इच्छित नाही. त्यामुळेच मी आत्महत्त्या करीत आहे

औरंगाबाद : ‘प्रिय आई- बाबा मी परीक्षेला सामोरे जाऊ शकत नाही. डॉक्टर होण्याची माझ्यात क्षमता नाही. सर्वांच्या अपेक्षांना मी तडा देऊ इच्छित नाही. त्यामुळेच मी आत्महत्त्या करीत आहे,’ अशा शब्दात प्रतीक्षा वाघ हिने मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत हतबलता व्यक्त केली आहे.अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षात शिकत असलेल्या प्रतीक्षा वाघ हिने गुरुवारी शिवाजीनगर येथे रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्त्या केली. परीक्षा तोंडावर आली असतानाच वर्ग मैत्रिणींनीही अबोला पकडला. नोट्स चोरल्याचा त्यांनी आरोप केला. यामुळे नैराश्य आल्याने प्रतीक्षा ही औरंगाबादेत आई-वडिलांकडे आली होती. आपण डॉक्टर व्हावे, अशी आई-वडिलांची इच्छा, मात्र त्यांची ही इच्छा आपण पूर्ण करू शकणार नाही, या मानसिकतेतून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. आत्महत्येपूर्वी तिने नोटबुकवर लिहिलेल्या चिठ्ठीत ‘आय कान्ट फेस एक्झाम अ‍ॅण्ड आदर थिंग्स ’असे नमूद केले आहे. प्रतीक्षा मोतीराम वाघ (१९, रा. शिवाजीनगर) हिची प्रथम वर्षाची परीक्षा २१ जूनपासून सुरु होणार होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अंबाजोगाई येथे वसतिगृहात राहणाऱ्या वर्ग मैत्रिणीसोबत महिनाभरापूर्वी तिचा वाद झाला. निशिगंधा नावाच्या मैत्रिणीने तिच्यावर नोट्स चोरल्याचा आरोप केला. तेव्हापासून निशिगंधासह पाच मैत्रिणींनी प्रतीक्षासोबत अबोला धरला होता. प्रतीक्षा ही निशिगंधाला मोबाईलवर मेसेज पाठवीत असे. मात्र त्या आपसात बोलत नव्हत्या. परीक्षा जवळ आली आणि त्यातच मैत्रिणींनी अबोला धरल्याने प्रतीक्षा महिनाभरापूर्वी औरंगाबादेत आली. तिने अभ्यासिका लावली होती. शिवाय ती शिकवणीलाही जात होती. जसजशी परीक्षा जवळ येत होती, तसतसा प्रतीक्षाचा मानसिक तणाव वाढला होता. या तणावातून तिने १४ जून रोजी निशिगंधा हीस मेसेज पाठविला. या मेसेजमध्ये म्हटले की, ‘निशिगंधा.. हा शेवटचा मेसेज आहे. तुझ्यामुळे मला हे पाऊल उचलावे लागत आहे. माझ्या शेवटास तूच जबाबदार आहे. पण हे मी कोणालाच सांगणार नाही. तुझ्या खुशीसाठी मी माझा जीव देत आहे आणि जोपर्यंत तू हा मेसेज वाचशील तोपर्यंत कदाचित मी जिवंत नसेल. कृपा करून आपले काय भांडण झाले कोणाला कळाले तर बरं होईल. तसं मी तर मरून चालले, पण माझ्या आईला थोडासा सपोर्ट दे आणि तुझे नाव कोणाला कळू देत नाही मी.’नोटबुकमध्ये नमूद केले आत्महत्येपूर्वीच विचारआई-बाबांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या प्रतीक्षाने आत्महत्येपूर्वी एका नोटबुकमधील तीन पानावर मनातील विचार मांडले आहे. इंग्रजीत लिहिलेल्या पानावर तिने डिअर मम्मी, पप्पा, सॉरी आय कान्ट फेस एक्झाम अ‍ॅण्ड आॅदर थिंग्स. आय हॅव नो पोटेन्शिअल टू बिकम डॉक्टर, आय डोन्ट वॉन्ट टू लूज होप आॅफ माय फ्रेंड्स. दॅट्स व्हाय आय डुर्इंग सुसाईड, असे नमूद केले आहे. शिवाय तिने आई-बाबा, भाऊ आणि बहीण यांना उद्देशूनही चिठ्ठीत नमूद केले आहे. तक्रार न देता गेले परतदरम्यान, शुक्रवारी सायंकाळी तिचे वडील आणि अन्य नातेवाईक पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल आडे यांनी त्यांना पोलिसांनी जप्त केलेली नोटबुक दाखविली. नोटबुकमधील चिठ्ठीवरून तिने आत्महत्या कोणाच्याही त्रासामुळे केल्याचे दिसत नसल्याचे सांगितले. शेवटी जबाब नोंदवून ते घरी परतले. त्यांनी तक्रार दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.....तर प्रतीक्षा वाचली असतीप्रतीक्षा मेसेज वाचल्यानंतर घाबरलेल्या निशिगंधा हिने ही बाब तातडीने वसतिगृहाचे इन्चार्ज आणि अधिष्ठाता यांना सांगितले. शिवाय तिने हा मेसेज प्रतीक्षाच्या वडिलांना पाठवून दिला. शिवाय अधिष्ठातांनीही प्रतीक्षाच्या वडिलांना फोन करून तिचे समुपदेशन करण्याचे सांगितले. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी प्रतीक्षाचे समुपदेशन करण्यासाठी मनोविकार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे ठरविले. त्यामुळे समुपदेशनानंतर शुक्रवारी प्रतीक्षाला सोबत घेऊन ते अंबाजोगाईला जाणार होते. आई-वडिलांनी तिची समजूत काढल्यामुळे तिने आत्महत्या करणार नसल्याचे सांगितले. मात्र, तिच्या मनात आत्महत्येचा विचार सतत घोंगावत होता. हे मात्र तिच्या आई-वडिलांच्या लक्षात आले नाही. गुरुवारी सकाळी ती अभ्यासिकेत जाते असे सांगून घराबाहेर पडली. त्यानंतर अभ्यासिकेसमोर दुचाकी उभी करून ती थेट रेल्वेपटरीवर गेली. रेल्वेसमोर उडी घेऊन तिने जीवनयात्रा संपविली. तिच्या आई-वडिलांनी तिला घराबाहेर जाऊ दिले नसते तर प्रतीक्षा वाचली असती.