शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अधिग्रहणाबरोबर टँकरही वाढले

By admin | Updated: January 1, 2015 00:26 IST

लातूर : पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार तालुकास्तरावर टंचाई कक्ष स्थापन करण्यात आले आहेत़ दहाही तालुक्यांच्या टंचाई निवारण कक्षात अधिग्रहणाचा ओघ वाढला आहे़

लातूर : पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार तालुकास्तरावर टंचाई कक्ष स्थापन करण्यात आले आहेत़ दहाही तालुक्यांच्या टंचाई निवारण कक्षात अधिग्रहणाचा ओघ वाढला आहे़ ११७ गावे व २५ वाड्यांतून अधिग्रहणाची मागणी करण्यात आली आहे़ टंचाई कक्षात १८५ प्रस्ताव सध्या दाखल आहेत़ ७७ प्रस्तांवाना मंजुरी देण्यात आली आहे़जिल्हा परिषदेच्या वतीने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेत टंचाई कक्षाची स्थापना करण्यात आली आहे़ जिल्हा परिषदेने १ डिसेंबरपासून तालुकानिहाय पंचायत समिती अंतर्गत टंचाई कक्षाची स्थापना करण्यात आली आहे़ मागणीनुसार पाणीपुरवठा करण्याच्या सूचना संबंधित पंचायत समितीला जिल्हा परिषदेच्या वतीने समन्वय बैठकीत करण्यात आल्या आहेत़ या टंचाई कक्षाचा प्रमुख म्हणून गटविकास अधिकारी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे़ पाणीटंचाईच्या आलेल्या प्रस्तावाची माहिती तहसीलदार यांना तात्काळ देवून त्याची गरज लक्षात घेवून त्यावर दोन दिवसात कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत़ या आदेशानुसार लातूर तालुक्यातील टंचाई कक्षाकडे ३० गावे, ४ वाड्यातून विहिरी, बोअरच्या अधिग्रहाणाची मागणी आली आहे़ पण प्रत्यक्षात २६ गावातून ४२ प्रस्तांवाची मागणी आली आहे़ यातील २१ गावातील ३५ प्रस्ताव मंजुर करण्यात आले आहेत़ औसा तालुक्यातील २१ गावातून ४३ विहीर, बोअरचे अधिग्रहणाचे मागणी प्रस्ताव आले आहे़ यातील ६ गावचे ७ विहीर, बोअर अधिग्रहणाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे़ निलंगा तालुक्यातील १५ गावांमधून, १ वाडीमधून ४२ विहीर, बोअर अधिग्रहणाचे मागणी करण्यात आली आहे. ४ गावातील ८ प्रस्तांवाना मंजुरी देण्यात आली आहे़ निलंगा तालुक्यात २ गावातील ५ विहिर, बोअर अधिग्रहणाच्या मागणी प्रस्तावास मंजुरी आहे़ रेणापूर तालुक्यतील १५ गावामधून, १० वाड्यांमधून ४७ अधिग्रहणाची मागणी आहे.(प्रतिनिधी)औसा तालुक्यातील मासुर्डी ,टाका येथे दोन टँकर तर अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव ,परचंडा दोन टॅकर ने पाणी पुरवाठा करण्यात येत आहे़ लातूर तालुकतील बाभळगाव, चिंचोली (ब़) चार टँकर सुरु आहेत़ रेणापूर तालुक्यातील कारेपूर-गोपाळवाडी, एक टँकर आणि जळकोट तालुक्यातील उमरदरा येथे एक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ अशा प्रकारे जिल्ह्यात ८ गावांतून १० टँकरणे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़