शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

टँकरही कमी क्षमतेचे टँकर दोन अन् चालक एकच !

By admin | Updated: February 8, 2015 00:10 IST

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या दोन टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या दोन टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु, दोन पैकी एक चालक आठ ते नऊ दिवसांपासून कर्तव्यावर नसल्याने सध्या ‘टँकर दोन अन् चालक एक’, अशी परस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे.दोन-तीन वर्षांपासून पारगावसह परिसरामध्ये सरासरीच्या अत्यल्प पाऊस होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वीच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर ओढावते. यंदाही यापेक्षा काही वेगळे चित्र नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच टँकर सुरू करण्यात आले आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने जलस्त्रोतही झपाट्याने कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे टँकरची संख्या आता दोनवर पोहोचली आहे. या दोन टँकरच्या माध्यमातून गावातील २२ पॉर्इंटवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र मागील आठ ते नऊ दिवसांपासून एका टँकरचे चालक मच्छिंद्र कांबळे हे कर्तव्यावर नाहीत. येथे सध्या दोन टँकर अन् चालक एक, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्तव्यावर असलेले चाकल शेख चाँद पाशा यांच्या खांद्यावर दोन्ही टँकरची जबाबदारी येवून ठेपली आहे. एक टँकर भरून पॉर्इंटवर उभा केल्यानंतर रिकामा झालेला दुसरा टँकर पाणी भरण्यासाठी घेवून जावा लागतो. त्यामुळे चालक पाशा हेही चांगलेच हैराण झाले आहे. या सर्व गोंधळामुळे ग्रामस्थांना मात्र, टंचाईच्या झळा सोसाव्याल लागत आहेत. याबाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. चालक गैरहजर असल्याबाबत तहसीलसोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविण्यात आले आहे. मात्र चालकाची व्यवस्था झाली नसल्याचे सरपंच डी.एन. मोटे यांनी सांगितले. (वार्ताहर) पारगावची लोकसंख्या दहा हजाराच्या घरात आहे. २२ ठिकाणी टँकरसाठी पॉर्इंट निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे एकेका कुटुंबास तीन दिवसाआड दोनशे ते अडीचशे लिटर पाणी मिळते. परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेवून किमान तेरा हजार लिटर क्षमतेचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.