शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

टँकर ८० टक्क्यांनी घटले!

By admin | Updated: May 29, 2017 00:32 IST

जालना : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात दोन वर्षांत झालेल्या जलसंधारणाची काम आणि मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे भूजलपातळीत दोन मीटर वाढ झाली आहे.

बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात दोन वर्षांत झालेल्या जलसंधारणाची काम आणि मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे भूजलपातळीत दोन मीटर वाढ झाली आहे. परिणामी अनेक गावांमध्ये आजही पाणी उपलब्ध असून, मागील वर्षीच्या तुलनेत टँकरची संख्या ८० टक्क्यांनी म्हणजेच सव्वाचारशेने घटली आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात २१२ तर दुसऱ्या टप्प्यात १८६ गावांमध्ये जलसंधारणाची कामे झाली. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता शासकीय यंत्रणेबरोबर अनेक खाजगी कंपन्या व सेवाभावी संस्थानी जलसंधारणाच्या कामांसाठी पुढाकार घेतला.वर्र्ष २०१५-१६ मध्ये लोकसहभागातून १७ कोटी रुपये खर्चून ५५ लाख घनमीटर गाळ उपसा करण्यात आला, तर २८८ किलोमीटर नालाखोलीकरण करण्यात आले. त्यामुळे ४९ हजार ५५० हेक्टर सिंचनाखाली आले. त्यातच मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्यामुळे अनेक गावांमधील शासकीय व खाजगी विहिरींमध्ये मे, जूनमध्ये पाणी उपलब्ध आहे. याचा थेट परिणाम उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे वाढणाऱ्या टँकरच्या संख्येवर झाला आहे. मागील वर्षी मे मध्ये ग्रामीण भागात तब्बल ५४८ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. हा आकडा यंदा केवळ १२२ वर आला आहे. यामध्ये खाजगी टँकरची संख्या १०१, तर शासकीय टँकरची संख्या केवळ २१ आहे.भोकरदन तालुक्यात मागील वर्षी १९९ वर गेलेली टँकरची संख्या यंदा केवळ ४६ आहे. बदनापूर तालुक्यातील २९ गावांना सध्या २६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, ही संख्या मागील वर्षी १६४ होती. घनसावंगी व अंबड तालुक्यातील सहा गावे मिळवून केवळ आठ टँकर सुरू आहेत. हा आकडा मागील वर्षी १६३ वर पोचला होता. परतूर व मंठ्यातील सात गावांमध्ये सध्या सात टँकर सुरू आहेत, ही संख्या मागील वर्षी ९५ वर पोचली होती. जाफराबाद तालुक्यात गत वर्षी १५३ टँकर सुरू होते, यंदा हा आकडा केवळ ३१ आहे. एकंदरीत जिल्ह्यातील दुष्काळाच्या दाहकतेवर फुंकर घालण्याचे काम जलयुक्त शिवार अभियान व लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या चळवळीमुळे शक्य झाले आहे.