शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या तनीषाने केले भारतीय संघातील स्थान निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:51 IST

औरंगाबाद येथील उदयोन्मुख प्रतिभावान बुद्धिबळपटू तनीषा बोरामणीकर हिने पुणे येथे नुकत्याच झालेल्या ११ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले. या यशाबरोबरच तिने पुढील वर्षी थायलंड व स्पेन येथे होणाºया अनुक्रमे एशियन युथ आणि वर्ल्ड युथ बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारतीय संघातील स्थान निश्चित केले.

ठळक मुद्दे११ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा : मिळवले तिसरे स्थान

औरंगाबाद : औरंगाबाद येथील उदयोन्मुख प्रतिभावान बुद्धिबळपटू तनीषा बोरामणीकर हिने पुणे येथे नुकत्याच झालेल्या ११ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले. या यशाबरोबरच तिने पुढील वर्षी थायलंड व स्पेन येथे होणाºया अनुक्रमे एशियन युथ आणि वर्ल्ड युथ बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारतीय संघातील स्थान निश्चित केले.पुणे येथे ११ फेºयांत झालेल्या या स्पर्धेत देशभरातील ३५0 स्पर्धक सहभागी झाले होते. १५२३ इंटरनॅशनल रेटिंग असणाºया तनीषाला या स्पर्धेत चौथे मानांकन देण्यात आले होते. तिने पहिल्या दोन फेºयांत उत्तर प्रदेशच्या आयुषी के. व दिल्लीच्या अनिष्का विक्रम यांचा सहज पराभव केला; परंतु तिसºया फेरीत तिला दिल्लीच्या कामया नेगी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला, तर आंध्र प्रदेशच्या वर्षिणी एम. हिच्याविरुद्धचा डाव तिने बरोबरीत सोडवला. तथापि, त्यानंतर तिने जबरदस्त मुसंडी मारताना गुजरातच्या विश्वा वासनवाला, आसामच्या नंदिका साहू, ओरिशाच्या साईरूपा पी., गोवा येथील अलिया व्हेला आणि तामिळनाडूच्या एस. मृदुभाषिणी यांच्याविरुद्ध विजय मिळवला. त्यानंतर १0 व्या फेरीत तिने तामिळनाडूच्या के. रत्नप्रिया व अखेरच्या फेरीत २0१६ च्या राष्ट्रीय विजेत्या सविता श्री यांना बरोबरीत रोखले. या स्पर्धेत तनीषाने ११ पैकी ८.५ गुणांसह तिसरे स्थान मिळवले. त्याचबरोबर तिने सलग तिसºयांदा भारतीय संघातील स्थान निश्चित केले. २0१३ मध्ये तनीषाने ७ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते, तर अहमदाबाद येथे २0१४ मध्ये ताश्कंद येथे झालेल्या एशियन युथमध्ये कास्यपदक जिंकले होते. त्याचप्रमाणे २0१५ मध्ये तिने अहमदाबाद येथील ९ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत भारतीय संघात स्थान मिळवले होते. तिला सतीश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल तिचे औरंगाबाद जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आ. अतुल सावे, आॅल मराठी चेस असोसिएशनचे कार्यकारी विजय देशपांडे, सचिव हेमेंद्र पटेल, उपाध्यक्ष किशोर लव्हेकर आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.