शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय स्वच्छतेसाठी न.प.वर ‘टमरेल’ मोर्चा

By admin | Updated: August 7, 2014 23:33 IST

बीड: शहरातील शौचालयांची दुरवस्था झाली आहे. यामुळे महिला व पुरुषांना असुविधेचा सामना करावा लागत आहे.

बीड: शहरातील शौचालयांची दुरवस्था झाली आहे. यामुळे महिला व पुरुषांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. या विरोधात गुरुवारी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने बीड नगर परिषदेवर ‘टमरेल’ मोर्चा काढण्यात आला.शहरातील माळीवेस परिसरातील शौचालयाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मागील दोन महिन्याच्या काळात अनेकवेळा बीड नगर परिषदेला स्वच्छता करण्याबाबत विनंती करुनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने भारिप बहुजन महासंघाच्या वतीने गुरुवारी बीड नगर परिषदेवर टमरेल मोर्चा काढून नगर परिषदेच्या विरोधात निषेध नोंदवून घोषणाबाजी केली. शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे सर्वत्र दुर्गंधी सुटली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असल्याचे पहावयास मिळत आहे. तीन वर्षांपूर्वी बीड नगर परिषदेने शहरात काही ठिकाणी शौचालय बांधले होते. मात्र शौचालयात पाण्याची देखील व्यवस्था नाही. यामुळे शौचालय परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत अनेकवेळा बीड न.प.ला कळवून देखील शहरातील शौचालयाची स्वच्छता केली नसल्याचे भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांनी सांगितले. माळीवेस परिसरात ऐन चौकातच न.प.चे शौचालय आहे. शौचालयाभोवती गाजर गवत उगवलेले आहे. त्याबरोबरच येथील गटारी देखील अनेक महिन्यांपासून तुंबलेल्या आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झालेली आहे. यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. मोर्चाप्रसंगी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी बीड नगर परिषदेचा परिसर दणाणून गेला होता. मोर्चाला अभिमान उजगरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल वाघमारे, शहराध्यक्ष सतीश विद्यागर, जिल्हा सहसंघटक गौतम सिरसट, तालुकाध्यक्ष भीमराव पायाळ, सागर कांबळे, तालुुका संघटक अजय वाघमारे यांची उपस्थिती होती. मोर्चामध्ये महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)