शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

लाखावरच बोळवण !

By admin | Updated: July 16, 2014 01:23 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड जिल्ह्यात सतत पडणारा दुष्काळ अन् यातून येणारे नैराश्य यामुळे जिल्हयातील बळीराजा पुरता कोलमडून पडलेला आहे.

व्यंकटेश वैष्णव , बीडजिल्ह्यात सतत पडणारा दुष्काळ अन् यातून येणारे नैराश्य यामुळे जिल्हयातील बळीराजा पुरता कोलमडून पडलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. १ जानेवारी २०१४ ते २८ जून २०१४ या सहा महिन्याच्या कालावधीत जिल्हयातील ५५ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, शेतीची नापिकी व गारपीट यामुळे आत्महत्या केली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाखाची मदत शासनाने केली आहे. मात्र एक लाखाच्या मदतीने आत्महत्या थांबतील का असा प्रश्न जिल्हयातील शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते द्वारकादास लोहिया यांनी उपस्थित केला आहे.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जात असले तरी देखील या योजनांचा शेतकऱ्यांना उभा रहाण्यासाठी काहीच उपयोग होत नसल्याचेच शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारी वरून स्पष्ट होते. ८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची प्रकरणे पडताळणी बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांने खरोखरच नापिकी व कर्जबाजारीपणामुळेच आत्महत्या केली आहे का? हे पडताळून पाहण्यात आले. शेतकरी आत्महत्येची वेगवेगळी कारणे सांगण्यात आलेली आहेत. शासन समुपदेशन करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र समुपदेशनाच्या पलीकडे जाऊन शासनाने काम करणे आवश्यक असल्याचे मानवलोक संस्थेचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते द्वारकादास लोहीया यांनी सांगितले.शेतीसाठी कर्ज मिळविण्यासाठी बँकाची उंबरटे झिजवून देखील बँका दारात उभ्या करत नाहीत. अलीशान वाहने घेण्यासाठी सहज कर्ज उपलब्ध होऊ शकते मात्र शेतकऱ्यांना शेतात पाईपलाईन करण्यासाठी कर्ज मागितले तर किमान २५ बँकाचे ना हारकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. पंचायत समिती मार्फत अल्प भू धारक शेतकऱ्यांना विविध औजारे दिली जातत. ही औजारे योग्य व गरजू शेतकऱ्यांपर्यंत जातात का? हे पहाणारी यंत्रणा आज तरी जिल्हा प्रशासनाकडे नाही. याचाच फायदा घेऊन ‘लँड लॉर्ड’ लॉबी शासनाच्या विविध योजना खाऊन टाकत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन करण्यात येते. शेतकऱ्यांनी कर्जबाजारी पणामुळे आत्महत्येचा मार्ग स्विकारू नये असे उप जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.गेवराई तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्याजिल्ह्यात ५५ पैकी ३७ आत्महत्याग्रस्त शेतकरी शासन मदतीस पात्र ठरले आहेत. १४ शेतकरी अपात्र आहेत. तसेच गेवराई तालुक्यातील एका शेतकऱ्याचा अहवालच जिल्हा प्रशासनाकडे आला नाही तर गेवराई येथीलच एक शेतकऱ्याच्या आत्महत्येचा प्रस्ताव फेर चौकशीसाठी पाठविण्यात आलेला आहे. शेतकरी आत्महत्येचा अहवाल पाहता एकट्या गेवराई तालुक्यात मागील सहा महिन्यात नापिकी, गारपिटीचे संकट यामुळे १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आष्टी तालुक्यात २ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे.फक्त ३७ कुटुंबियांना मिळाली मदतजानेवारी २०१४ ते जून २०१४ दरम्यान झालेल्या शेतकरी आत्महत्या तालुकापात्रअपात्रअहवाल प्राप्त नाहीबीड०७०४००परळी०२०१००गेवराई१२०४०२पाटोदा०४०००१अंबाजोगाई०३०१००धारूर०५०१००केज०१०१००माजलगाव०००१००शिरूर कासार०००१००वडवणी०१००००आष्टी०२००००