शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दाखले न देण्याचा तलाठी संघाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:39 IST

महसूल विभागाच्या तलाठी मंडळ अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येणारे विविध ३५ प्रकारचे दाखले न देण्याचा निर्णय तलाठी संघाने घेतला असून याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. आतापर्यंत हे दाखले तलाठ्याकडूनच देण्यात येत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महसूल विभागाच्या तलाठी मंडळ अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येणारे विविध ३५ प्रकारचे दाखले न देण्याचा निर्णय तलाठी संघाने घेतला असून याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. आतापर्यंत हे दाखले तलाठ्याकडूनच देण्यात येत होते.महसूल विभागाच्या तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडून आतापर्यंत वारसा प्रमाणपत्र, वंशावळ पंचनामा, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, निराधार असल्याबाबतचा दाखला, विहीर असल्याचा दाखला, चल, चलसंपतीचा दाखला, बागायतीचे प्रमाणपत्र, भूमिहीन दाखला, शेतजमिनीचा नकाशा आदी ३५ प्रकारचे दाखले दिले जात होते. मात्र काही न्यायालयीन प्रकरणांमध्ये हे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार तुम्हाला कोण दिला? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला होता. या प्रकरणात महसूल कर्मचारी अडचणीत आले होते. ही बाब लक्षात घेऊन तलाठी संघाने दाखले न देण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण राज्यात दाखले न देण्याचे धोरण स्वीकारले आहे. परिणामी परंपरागतरीत्या दिल्या जाणाºया या प्रमाणपत्रासाठी आता सामान्य गावकºयांची धावपळ होणार आहे. तलाठी, मंडळ अधिकाºयांकडून दिल्या जाणाºया या प्रमाणपत्रासंदर्भात अधिकृत नमुना किंवा कार्यपद्धती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ संहितेत विषद केला नाही. परिणामी तलाठी, मंडळ अधिकाºयांनी हे प्रमाणपत्र का द्यायचा? असा सवाल तलाठी संघटनेने उपस्थित केला आहे. शासनाने विविध प्रकरणांमध्ये स्वयंघोषणापत्र देवून अर्ज करण्यास मुभा दिली आहे. त्याबाबतचे परिपत्रकही काढले आहे. नागरिकांनी त्या प्रमाणे अर्ज करावेत, असे आवाहन संघटनेने केले आहे.महात्मा गांधी जयंती अर्थात २ आॅक्टोबरपासून तलाठी संघाने संपूर्ण राज्यात विविध प्रकारचे ३५ दाखले न देण्याचा निर्णय घेतला. सोमवारी सुटीचा दिवस होता. मंगळवारी अनेक नागरिक पंचायत समिती कार्यालयात, तलाठी कार्यालयात, मंडळ अधिकारी कार्यालयात पोहोचले. त्यावेळी त्यांना नकार मिळाला. परिणामी अनेकांची मोठी गैरसोय झाली. काही ठिकाणी खटकेही उडाले.तलाठी व मंडळ अधिकाºयांनी नागरिकांना आपल्या कायदेशीर अडचणीसंदर्भात समजावून सांगावे. तसेच लवकरच या विषयावर शासनाकडून निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. आपली भूमिका समजावून सांगण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष एन.जी. कानगुले, सचिव उदय मिसाळे, कार्याध्यक्ष पठाण, निमंत्रक प्रफुल्ल खंडागळे यांनी केले आहे.