शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तांदूळवाडी सज्जाचा तलाठी चतुर्भूज

By admin | Updated: December 4, 2014 00:53 IST

वाशी : खरेदी केलेल्या शेतजमिनीचा फेरफार मंजूर करून घेऊन सातबारा व फेरफारची नक्कल देण्यासाठी खाजगी लेखनीकामार्फत एक हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या

वाशी : खरेदी केलेल्या शेतजमिनीचा फेरफार मंजूर करून घेऊन सातबारा व फेरफारची नक्कल देण्यासाठी खाजगी लेखनीकामार्फत एक हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी रंगेहात अटक केली. तालुक्यातील तांदूळवाडी येथे ही कारवाई करण्यात आली.याबाबत एसीबी विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, यातील तक्रारदाराने त्यांच्या भावाकडून जवळका शिवारातील शेतजमीन खरेदीखत करून घेतल्यानंतर ४ जानेवारी २०१३ रोजी त्यांनी फेरफारच्या कमासाठी सर्व कागदपत्रे तांदूळवाडी सज्जाचे तलाठी राजाभाऊ दगडू कुंभार यांच्याकडे दिले होते. यानंतर तक्रारदार हे फेरफारच्या कामाबाबत विचारणा करण्यासाठी कुंभार याच्याकडे गेले असता कुंभार यांनी फेरफारची कागदपत्रे पहावी लागतील, कागदपत्रांची फाईल मंडळ अधिकाऱ्यांकडे पाठवावी लागेल, फेरफार मंजूर करण्यासाठी पैसे लागतात, असे सांगून एक हजार रुपयांची मागणी केली. यानंतरही तक्रारदारांनी वारंवार कुंभार यांच्याकडे कामाबाबत चकरा मारल्या. मात्र, कुंभार यांनी ‘एक हजार रूपये आणून दे, तुझे फेरफारचे काम करून घेऊन सातबारा व फेरफारची नक्कल देतो. नाहीतर तुला कुठे जायचे तिकडे जा’, असे सांगितले. यावरून तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली.या तक्रारीवरून एसीबीचे पोलस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक नेकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अश्विनी भोसले यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने बुधवारी तांदूळवाडी येथे सापळा रचला. यावेळी तलाठी कुंभार याने तक्रारदाराकडे एक हजार रूपये लाचेची मागणी करून खाजगी लेखनिक विलास चौधरी याच्यामार्फत ती स्वीकारल्यानंतर रंगेहात अटक करण्यात आली. याप्रकरणी तलाठ्यासह लेखनिकावरही लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे उपअधीक्षक भोसले यांनी सांगितले. (वार्ताहर)