शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अंबडला मराठवाड्यातील उत्तम दर्जाचे शहर करण्यासाठी प्रयत्नशील- टोपे

By admin | Updated: November 30, 2015 23:31 IST

अंबड : शहरास मराठवाड्यातील उत्तम दर्जाचे शहर बनविण्यासाठी सतत प्रयत्नशील असून, याच भुमिकेतून आज आपण ३ कोटी १२ लाख रुपयांच्या १८ रस्त्यांचे भूमिपूजन केल्याचे

अंबड : शहरास मराठवाड्यातील उत्तम दर्जाचे शहर बनविण्यासाठी सतत प्रयत्नशील असून, याच भुमिकेतून आज आपण ३ कोटी १२ लाख रुपयांच्या १८ रस्त्यांचे भूमिपूजन केल्याचे प्रतिपादन आ.राजेश टोपे यांनी शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या भूमिपूजन प्रसंगी केले. आ. टोपे यांनी शहरातील सर्व खराब रस्त्यांचे नुतनीकरण येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याची घोषणाही केली.अंबड हे उत्तम दर्जाचे शैक्षणिक, व्यापारी व सांस्कृतिक केंद्र म्हणुन उदयास यावे यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर सतत प्रयत्नशील आहोत. याच भुमिकेतून नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक योजना शहरात राबविण्यात आलेल्या आहेत. शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम अद्यापही सुरुच असुन भुयारी गटार योजनेच्या कामामुळे मागील अनेक महिन्यांपासुन रखडलेल्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. आज ३ कोटी १२ लाख रुपयांच्या १८ रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न झाले असुन उर्वरित रस्त्यांच्या कामांसाठी १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. काही तांत्रिक बाबींची पुर्तता करुन येत्या पंधरा दिवसांत शहरातील उर्वरित रस्त्यांचे भूमिपुजन होणार आहे. रस्त्यांच्या दर्जाबाबत काही शंका असल्यास त्याची तक्रार व निपटारा तत्काळ करणे गरजेचे आहे. नगरपालिकेने शहरातील सर्व ओपन प्लेस तत्काळ ताब्यात घेऊन त्यांना कुंपन घालण्याच्या तसेच त्यांना विकसीत करण्याच्या सुचना आपण नगरपालिकेल्या दिल्या आहेत. जायकवाडी पाणीपुरवठा होत असल्याने शहराचा पाणीप्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटला असुन शहरातंर्गत वितरण व्यवस्था बदलण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. सध्या तीन दिवसांआड पाणी पुरवठा होत असून लवकरच दररोज करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे आ.टोपे म्हणाले. कार्यक्रमास नगराध्यक्षा मंगलताई कटारे, उपनगराध्यक्ष संदीप आंधळे, काकासाहेब कटारे, बाजार समिती सभापती सतिश होंडे, प्राचार्य डॉ भागवत कटारे उपस्थित होते.