शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भटक्यांच्या प्रशिक्षण केंद्रासाठी पुढाकार घेऊ

By admin | Updated: February 25, 2017 00:36 IST

तामलवाडी :तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथे महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी भटके विमुक्त विकास परिषद व प्रतिष्ठानच्या वतीने भटक्यांचा स्रेहमेळावा पार पडला.

तामलवाडी : भटके समाजातील मुला-मुलींच्या अंगी असलेले कला-कौशल्य जोपासून त्याला वाव मिळणे आवश्यक आहे. या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून यमगरवाडी येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेऊ, अशी ग्वाही राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथे महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी भटके विमुक्त विकास परिषद व प्रतिष्ठानच्या वतीने भटक्यांचा स्रेहमेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भटके विकास परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा रावळ तर प्रमुख पाहुणे म्हणून किशोर देशपांडे, नरसिंग झरे, महादेवराव गायकवाड, डॉ. अभय शहापूरकर, रावसाहेब कुलकर्णी, डॉ. संजय पुरी, चंद्रकांत गडेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, अ‍ॅड. मिलिंद पाटील आदी उपस्थित होते. मेळाव्यास गजानन धरणे, विजय शिंगाडे, अण्णासाहेब चव्हाण, रामदास चव्हाण, डॉ. स्वाती बारसकर, स्मीता बारसकर, दयानंद राठोड, सतीश गंधे, राजेंद्र भट्ट, डॉ. जे. एस. कुलकर्णी, लता पुरी, भामाबाई देवकर, ललिता जाधव, डॉ. संपदा पाटील, तुकाराम पोलकर, स्वाती कुलकर्णी, सपोनि मिर्झा बेग, मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, अण्णासाहेब मगर, महादेव शेंडगे, अ‍ॅड. चित्राव गोरे, युवराज नळे, किशोर देशपांडे, रौप्यमहोत्सव कार्यकारी समितीचे विनोद पेंढारकर, रावसाहेब ढवळे, गजानन धरणे, शुभांगी तांबट, विजय वाघमारे, राजाभाऊ गजरे, नारायण बाबर, भारत विभुते आदी उपस्थित होते. यमगरवाडी विद्यासंकुलाच्या माळावर आयोजित या स्रेहमेळाव्यात घिसाडी, पाथरवट, ओतारी, कैैकाडी, पारधी या समाजातील महिला, विद्यार्थी तसेच बचत गटाच्या महिलांनी स्वत: तयार केलेल्या विविध साहित्यांचे स्टॉल उभारले होते. यासोबतच २५ वर्ष भटके विकास परिषदेने भटक्यांसाठी काय काम केले, यातून यशाचा मार्ग कसा सापडला, याबाबतची माहिती देणारे पोस्टर प्रदर्शनही लावण्यात आले होते.