शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

‘स्वाईन फ्लू’ची घ्या काळजी

By admin | Updated: February 8, 2015 00:11 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले असून, आतापर्यंत दोघांचा बळी गेला आहे. तर तिसऱ्या स्वाईन फ्लू संशयिताचाही मृत्यू झाला आहे.

लातूर : लातूर जिल्ह्यात स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले असून, आतापर्यंत दोघांचा बळी गेला आहे. तर तिसऱ्या स्वाईन फ्लू संशयिताचाही मृत्यू झाला आहे. सरकारी दवाखान्यात स्वाईन फ्लूची बाधा झालेले चार रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच संशयित सहा जणांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या आजाराबाबत सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले असून, प्रतिबंधात्मक सूचना जारी केल्या आहेत. स्वाईन फ्लू हा इन्फ्लूएन्झा ए (एच१ एन१) या विषाणूमुळे होणारा आजार आहे. याचा संसर्ग एका माणसापासून दुसऱ्या माणसाला होतो. ताप येणे, खोकला, नाक गळणे, घशाला खवखव, घसा दुखणे, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या, घशाला सूज येऊन तीव्र वेदना होणे, धाप लागणे आदी लक्षणे स्वाईन फ्लूने आजारी असलेल्या व्यक्तीमध्ये दिसतात. अशी लक्षणे आढळून आल्यास तातडीने लातूरच्या सरकारी दवाखान्यात तपासणी करून घ्यावी. विशेषत: पाच वर्षांखालील मुले (विशेष करून एक वर्षाखालील बालके), ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग, मधुमेह, यकृत, मुत्रपिंड आजाराने ग्रस्त असलेल्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे. अशा आजाराच्या व्यक्ती तसेच चेतासंस्थेचे विकार असलेल्या व्यक्ती, रोगप्रतिकारशक्तीचा ऱ्हास झालेल्या तसेच दीर्घकाळ स्टिरॉईड औषधी घेणाऱ्या व्यक्तींमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणे दिसत असल्यास त्यांनी तातडीने सरकारी दवाखान्यात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन स्वाईन फ्लू कक्षाचे प्रमुख डॉ. राम मुंडे आणि महानगरपालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पाटील यांनी संयुक्तरीत्या केले आहे. (प्रतिनिधी)स्वाईन फ्लू संसर्गजन्य असल्याने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी दक्ष रहावे. संसर्गजन्य व्यक्तीस हस्तांदोलन करणे टाळावे. भरपूर विश्रांती घ्यावी. भरपूर पाणी प्यावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषधांचे सेवन करू नये, असे आवाहन आहे.स्वाईन फ्लू टाळण्यासाठी जनतेने सतर्क रहावे. खबरदारीचे उपाय म्हणून वारंवार साबणाने व स्वच्छ पाण्याने हात धुवावेत. खोकताना व शिंकताना हातरुमाल नाकासमोर धरावा. नाक, चेहरा व डोळ्यांना स्पर्श करण्यापूर्वी साबणाने हात धुवावेत. तणावापासून दूर रहावे. आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचा वापर करावा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.